विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलियाला जबरी धक्का, दोन स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
Steve Smith And Mitchell Starc Ruled Out : यंदाचा वनडे विश्वचषक भारतामध्ये होत आहे. 5 ऑक्टोबरपासून भारतामध्ये विश्वचषकाला सुरुवात होत आहे.
Steve Smith And Mitchell Starc Ruled Out : यंदाचा वनडे विश्वचषक भारतामध्ये होत आहे. 5 ऑक्टोबरपासून भारतामध्ये विश्वचषकाला सुरुवात होत आहे. विश्वचषकासाठी 50 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिलाय. त्यापूर्वीच ऑस्ट्रेलिला जबरी धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचे दोन स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलियाच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने विश्वचषकासाठी संभाव्य संघाची घोषणा केली होती. त्यामध्ये दिग्गज खेळाडूंचा भरणा होता.
दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधीच ऑस्ट्रेलियाला दुखापतीचे ग्रहण लागलेय. स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क दुखापतग्रस्त झाले आहेत. या दोन्ही खेळाडूंनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतल्याचे समजतेय. विश्वचषकाच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियासाठी दक्षिण आफ्रिका दौरा महत्वाचा आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलिया भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. त्या पार्श्वभूमिवर ऑस्ट्रेलिया संपूर्ण ताकदीने मैदानात उतरणार होता. पण स्मिथ आणि स्टार्क दुखापतग्रस्त झालेत. कर्णधार पॅट कमिन्स याने दुखापतीमुळे आधीच दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली आहे.
स्टीव्ह स्मिथ याच्या मनगटाला दुखापत झाली आहे. तर मिचेल स्टार्क याला कंबरेची दुखापत झाली आहे. त्यामुळे दोन्ही खेळाडूंनी दक्षिण आफ्रिका मालिकेतून माघार घेतली आहे. स्मिथच्या जागी टी20 मध्ये एश्टर टर्नर याला स्थान दिलेय तर वनडेमध्ये मार्नस लाबुशेन याला स्थान दिलेय. मिचेल स्टार्क याच्या जागी जॉनसन याचा समावेश करण्यात आलाय.
भारताविरोधात दोन्ही खेळाडू करणार पुनरागमन -
ऑस्ट्रेलिया संघाच्या मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांनी दोन्ही खेळाडूंनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतल्याची माहिती दिली. या दोन्ही खेळाडूंना आरामाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. स्मिथ आणि स्टार्क भारताविरोधातील मालिकेतून पुनरागमन करतील. विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये तीन सामन्याची वनडे मालिका होणार आहे.
विश्वचषकासाठी निवडण्यात आलेला ऑस्ट्रेलियाचा संभाव्य 18 सदसीय संघ -
पॅट कमिन्स (कर्णधार), सीन एबॉट, एश्टन एगर, अॅलेक्स खॅरी, नॅथन एलस, कॅमरुन ग्रीन, एरॉन हार्डी, जोश हेलवडून, ट्रेविस हेड, जोश इंग्लिंस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेविड वॉर्नर, अॅडम झाम्पा
विश्वचषक कधीपासून -
भारतात होणारा विश्वचषकाचा पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीची लढत होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे. विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हा हायहोल्टेज सामनाही अहमदाबाद येथेच होणार आहे. यंदाचा विश्वचषक दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत.