SL vs PAK: पाकिस्तान आणि श्रीलंकेत रंगणार आशिया चषकातील अंतिम सामना; कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड
SL vs PAK, Asia Cup 2022 Final: श्रीलंका आणि पाकिस्तान (Sri Lanka vs Pakistan) यांच्यात आज (11 सप्टेंबर) आशिया चषक 2022 स्पर्धेतील अंतिम सामना खेळला जाणार आहे.
SL vs PAK, Asia Cup 2022 Final: श्रीलंका आणि पाकिस्तान (Sri Lanka vs Pakistan) यांच्यात आज (11 सप्टेंबर) आशिया चषक 2022 स्पर्धेतील अंतिम सामना खेळला जाणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) हा सामना खेळला जाणार आहे. हे दोन्ही संघ सुपर- 4 फेरीच्या गुणतालिकेत टॉप 2 मध्ये होती. श्रीलंकेच्या संघानं सुपर-4 फेरीत एकही सामना गमावला नाही. तर, पाकिस्तानच्या संघाला एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय. श्रीलंकेच्या संघानंच सुपर 4 फेरीतील अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पाच विकेट्सनं धुव्वा उडवला. श्रीलंकेनं आतापर्यंत पाच वेळा आशिया चषक स्पर्धा जिंकली आहे. तर, पाकिस्तानला दोन वेळा ट्रॉफीवर नाव कोरता आलंय. यामुळं आज पुन्हा एकदा आशिया चषक जिंकण्याच्या उद्देशानं दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत.
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्याता खेळण्यात आलेल्या आशिया चषकातील सुपर 4 फेरीतील अंतिम सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात पाकिस्ताननं सुरुवातीला फलंदाजी करत श्रीलंकेसमोर 122 धावांचं आव्हान ठेवलं होतं. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघानं पाच विकेट्स राखून विजय मिळवला. श्रीलंकेकडून पाथुम निसांका, भानुका राजपक्षे तसेच दासून शनाका यांनी संयमी फलंदाजी केली. ज्यामुळं श्रीलंकेला विजयापर्यंत पोहोचता आलं.
हेड टू हेड रेकॉर्ड
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 22 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले. यातील 13 सामन्यात पाकिस्तानच्या संघानं विजय मिळवलाय. तर, 9 सामने श्रीलंकानं जिंकले आहेत. पण गेल्या 5 सामन्यांबद्दल बोलायचं झाले तर श्रीलंका अधिक प्रभावी ठरलाय. श्रीलंकेनं गेल्या 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत.
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आज 11 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामना किती वाजता सुरू होईल?
बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर, या सामन्याच्या अर्धातास पूर्वी नाणेफेक होईल.
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील लाईव्ह सामना कुठं आणि कसं पाहू शकतात?
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहे.
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पाहता येणार?
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार पाहता येणार आहे. याशिवाय आशिया चषकाच्या संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी https://marathi.abplive.com वर भेट देऊ शकतात.
संघ-
श्रीलंका:
दसुन शनाका (कर्णधार), दनुष्का गुणथिलका, पथुम निसंका, कुसल मेंडिस, चरित असलंका, भानुका राजपक्षे, आशेन बंडारा, धनंजया डी सिल्वा, वानंदु हसरंगा, महेश थीक्षणा, जेफरी वेंडरसे, प्रवीण जयविक्रमा, चमिका करुणारत्ने, दिलशान पथिराना, नुवानीडु फर्नांडो, नुवान तुषारा, दिनेश चांदीमल.
पाकिस्तान:
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन.
हे देखील वाचा-