एक्स्प्लोर

NZ vs ENG: तिसऱ्या कसोटी सामन्यातही इंग्लंडचं वर्चस्व, न्यूझीलंडला क्लीन स्वीप देण्यापासून 113 धावा दूर

New Zealand tour of England: इंग्लंड आणि न्यूझीलंड (NZ vs ENG) यांच्यात लीड्सच्या (Leeds) हेडिंग्ले मैदानावर (Headingley) तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना खेळला जातोय.

New Zealand tour of England: इंग्लंड आणि न्यूझीलंड (NZ vs ENG) यांच्यात लीड्सच्या (Leeds) हेडिंग्ले मैदानावर (Headingley) तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना खेळला जातोय. लीड्स कसोटी सामना जिंकण्यासाठी इंग्लंडच्या संघाला 113 धावांची गरज आहे. या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यात इंग्लंडनं न्यूझीलंडच्या संघाला मात करून मालिकेत 2-0 नं आघाडी घेतलीय. तर, लीड्स येथे खेळल्या जात असलेल्या अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडला क्लीन स्वीप देण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल. 

इंग्लंडसमोर 296 धावांचं लक्ष्य
सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा अर्धा संघ माघारी परतला. किवी संघाकडे केवळ 137 धावांची आघाडी होती.  डॅरिल मिशेल आणि टॉम ब्लंडल यांनी चौथ्या दिवशी न्यूझीलंडचा डाव पुढे नेला. पुन्हा एकदा दोघांमध्ये शतकी भागीदारी झाली. पण डॅरिल मिशेल (56) बाद होताच न्यूझीलंडच्या फलंदाजी ढेपाळली आणि संघाचा डाव 326 धावांवर आटोपला . टॉम ब्लंडल नाबाद 88 धावांची खेळी केली. इंग्लंडला 296 धावांचं लक्ष्य मिळालं.

ओली पॉप आणि जो रूट यांची दमदार फलंदाजी
चौथ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात 296 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडनं आपले दोन्ही सलामीवीर 51 धावांत गमावले. परंतु येथून ऑली पॉप (81) आणि जो रूट (55) यांनी शानदार फलंदाजी करत संघाची धावसंख्या पुढे नेली. या दोघांमध्ये 132 धावांची नाबाद भागीदारी झाली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडनं दोन विकेट्स गमावून 183 धावा केल्या. 

न्यूझीलंडच्या पहिल्या डावात डॅरिल मिशेलचं शतक
या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीला सुरुवात केली. टॉम लॅथम शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर न्यूझीलंडच्या संघानं पाठोपाठ विकेट्स गमावल्या. न्यूझीलंडनं 123 धावांवर पाच विकेट्स गमावल्या. त्यानंतर डॅरिल मिशेल (109) आणि यष्टिरक्षक टॉप ब्लंडल (55) यांनी न्यूझीलंडचा डाव सांभाळला. दोघांमध्ये 120 धावांची भागीदारी झाली. न्यूझीलंडनं पहिल्या डावात 329 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडनं तीन आणि जॅक लीचनं पाच विकेट्स घेतल्या.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng 1st T20 : आमचे हात बांधलेले आहेत...; वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाबाबत श्रेयस अय्यर अखेर बोलला, नेमकं काय म्हणाला?
आमचे हात बांधलेले आहेत...; वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाबाबत श्रेयस अय्यर अखेर बोलला, नेमकं काय म्हणाला?
Zim vs Ban Test : झिम्बाब्वेचा मोठा उलटफेर! WTC मध्ये 4 नंबरवर असलेल्या टीमला एका डावाने चारली धूळ; नोंदवला ऐतिहासिक विजय
झिम्बाब्वेचा मोठा उलटफेर! WTC मध्ये 4 नंबरवर असलेल्या टीमला एका डावाने चारली धूळ; नोंदवला ऐतिहासिक विजय
Vaibhav Sooryavanshi Ind vs Eng 1st T20 : आयर्लंडनंतर इंग्लंडमध्येही 'नो चान्स'...; वैभव सूर्यवंशी इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत एकही सामना खेळणार नाही? जाणून घ्या कारण
आयर्लंडनंतर इंग्लंडमध्येही 'नो चान्स'...; वैभव सूर्यवंशी इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत एकही सामना खेळणार नाही? जाणून घ्या कारण
ENG vs IND 1st T20 Live Streaming : सोनी की जिओ हॉटस्टार? एकाच वेळी 2 वेगवेगळ्या ठिकाणी दिसणार भारत-इंग्लंड LIVE सामना, फुकटात कुठे पाहता येणार? जाणून घ्या A टू Z
सोनी की जिओ हॉटस्टार? एकाच वेळी 2 वेगवेगळ्या ठिकाणी दिसणार भारत-इंग्लंड LIVE सामना, फुकटात कुठे पाहता येणार? जाणून घ्या A टू Z

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Income Tax Rules : तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | शनिवार
Lohgarh Fort: केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
Embed widget