एक्स्प्लोर

Arjun Tendulkar Wife Saaniya Chandhok : सचिन तेंडुलकरची सूनबाई झाली प्राण्यांची डॉक्टर, सानिया चंडोकने शेअर केले फोटो, नणंदबाई साराची कमेंट तुफान व्हायरल

Arjun Tendulkar Wife Saaniya Chandhok Veterinarian : क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबात आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

Arjun Tendulkar Wife Saaniya Chandhok Veterinarian : क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबात आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. त्यांचा मुलगा आणि क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर याची पत्नी सानिया चंडोक हिने आपल्या प्रोफेशनल आयुष्यात एक महत्त्वाचं यश मिळवलं आहे. सानिया आता सर्टिफाइड वेटरनरी टेक्निशियन झाली आहे. विशेष म्हणजे, तिने प्राण्यांची काळजी आणि आरोग्यसेवेशी संबंधित हे प्रमाणपत्र वर्ल्डवाइड व्हेटर्नरी सर्व्हिस (WVS) च्या एबीसी कार्यक्रमातून मिळवलं आहे.

सानियाने सोशल मीडियावर आपल्या या खास उपलब्धीची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. तिने पोस्टसोबत एक फोटोही शेअर केला असून, त्यामध्ये ती एका डॉगची तपासणी आणि काळजी घेताना दिसत आहे. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. विशेष म्हणजे, अर्जुनची बहीण आणि सानियाची नणंद सारा तेंडुलकर हिनेही तिच्या या पोस्टला लाइक करत आनंद व्यक्त केला.

प्राण्यांची सेवा करण्यासाठी घेतलं विशेष प्रशिक्षण

सानियाने शेअर केलेल्या पोस्टमधून तिचं प्राण्यांवरील प्रेम आणि त्यांच्यासाठी काम करण्याची इच्छा स्पष्टपणे दिसून येते. वेटरनरी टेक्निशियन म्हणून मिळालेल्या प्रशिक्षणामध्ये प्राण्यांच्या आरोग्याची निगा, त्यांच्या तपासणीशी संबंधित प्राथमिक प्रक्रिया आणि दैनंदिन वैद्यकीय काळजी यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश असतो. WVS च्या एबीसी कार्यक्रमाच्या माध्यमातून सानियाने हे प्रशिक्षण पूर्ण केलं असून, आता तिने पेट केअर क्षेत्रात स्वतःची व्यावसायिक ओळख आणखी मजबूत केली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by MR. PAWS (@mrpaws.in)

आधीपासूनच आहे पेट केअरचा व्यवसाय

सानिया चंडोक केवळ वेटरनरी टेक्निशियन झालेली नाही, तर ती एक उद्योजिकाही आहे. मुंबईमध्ये ती मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर एलएलपी हा पेट केअर व्यवसाय चालवते. या व्यवसायामध्ये पाळीव प्राण्यांसाठी ग्रूमिंग, स्किनकेअर आणि वेलनेसशी संबंधित सेवा दिल्या जातात. म्हणजेच, सानियासाठी प्राण्यांची काळजी घेणं हे केवळ व्यवसायापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. तिने या क्षेत्रात अधिक ज्ञान आणि कौशल्य मिळवण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षणही घेतलं आहे. त्यामुळे तिच्या नव्या प्रमाणपत्रामुळे पेट केअर क्षेत्रातील तिच्या कामाला आणखी वेग मिळण्याची शक्यता आहे.

मार्चमध्ये अर्जुन तेंडुलकरसोबत लग्न 

सानिया चंडोक आणि अर्जुन तेंडुलकर यांनी 5 मार्च 2026 रोजी लग्न केलं. अर्जुन हा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांचा मुलगा आहे. मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये पार पडलेल्या या विवाहसोहळ्याला क्रिकेट, बॉलिवूड आणि उद्योगविश्वातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. लग्नाआधीपासूनच अर्जुन आणि सानिया यांच्या नात्याची चर्चा होती. सानियाचे तेंडुलकर कुटुंबाशीही जुने संबंध असल्याचं सांगितलं जातं. अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरसोबतही तिचं चांगलं बॉन्डिंग असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे.

हे ही वाचा -

David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arjun Tendulkar Wife Saaniya Chandhok : सचिन तेंडुलकरची सूनबाई झाली प्राण्यांची डॉक्टर, सानिया चंडोकने शेअर केले फोटो, नणंदबाई साराची कमेंट तुफान व्हायरल
सचिन तेंडुलकरची सूनबाई झाली प्राण्यांची डॉक्टर, सानिया चंडोकने शेअर केले फोटो, नणंदबाई साराची कमेंट तुफान व्हायरल
IND vs SL 1st Test DAY-5 Live : पाचव्या दिवशी अखेर पहिली विकेट मिळाली! जडेजाने 95 धावांची जोडी फोडली, श्रीलंकेला दिला मोठा धक्का
पाचव्या दिवशी अखेर पहिली विकेट मिळाली! जडेजाने 95 धावांची जोडी फोडली, श्रीलंकेला दिला मोठा धक्का
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Ind vs Sl 1st Test : शांत अन् बुजऱ्या स्वभावाचा अजिंक्य रहाणे रवी शास्त्रींच्या आवाजात बोलू लागला; सगळेच चाट पडले, अख्खा स्टुडिओ पाहतच राहिला, Video
शांत अन् बुजऱ्या स्वभावाचा अजिंक्य रहाणे रवी शास्त्रींच्या आवाजात बोलू लागला; सगळेच चाट पडले, अख्खा स्टुडिओ पाहतच राहिला, Video
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Raksha Bandhan 2026: भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
Embed widget