SA vs AUS Semi Final Highlights : विश्वचषकाच्या महायुद्धात रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
SA vs AUS LIVE Score: भारतीय संघानं न्यूझीलंडचं आव्हान 70 धावांनी मोडीत काढून विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. विश्वचषकाची ही फायनल रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येईल.
LIVE
Background
South Africa vs Australia Semi Final LIVE Score : रोहित शर्माच्या भारतीय संघानं न्यूझीलंडचं आव्हान 70 धावांनी मोडीत काढून विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. विश्वचषकाची ही फायनल रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येईल. आणि फायनलच्या रणांगणात भारतीय संघाचा मुकाबला कोणत्या संघाशी होणार याचा फैसला आज कोलकात्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन बलाढ्य संघांमध्ये होणार आहे. विश्वचषकाच्या साखळीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघांनी नऊपैकी सात सामने जिंकून, प्रत्येकी 14 गुणांची कमाई केली होती. पण नेट रनरेटच्या निकषावर दक्षिण आफ्रिकेनं गुणतालिकेत दुसरा आणि ऑस्ट्रेलियानं तिसरा क्रमांक पटकावला होता. पण उभय संघांमध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाचा 134 धावांनी धुव्वा उडवला होता.
विश्वचषकातील दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये होणार आहे. दक्षिण आफ्रिका संघ गुणतालिकेत दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. ईडन गार्डन्स मैदानावर होणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड मानले जातेय. डेविड वॉर्नर, मॅक्सवेल, मिचेल मार्श आणि ट्रेविस हेड सध्या भन्नाट फॉर्मात आहेत. त्याशिवाय गोलंदाजीत पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सच्या जोडीला एॅडम झम्पा आहे. दुसरीकडे आफ्रिकाच्या संघामध्ये सातत्य दिसत नाही. क्विंटन डिकॉक फॉर्मात आहे. पण त्याला इतर फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळत नाही. एडन मार्करम, हेनरिक क्लासेन यांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही. गोलंदाजीतही कगीसो रबाडा, लुंगी एनगिडी यांच्या कामगिरीत सातत्य नाही.
पाऊस खोडा घालणार का ?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यादरम्यान पावसाचा कोणताही अंदाज नाही. पण ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. कोलकात्याचे तापमान 23 ते 25 डिग्री सेल्सियस इतके राहू शकते.
खेळपट्टी कशी, फलंदाजाची मौज की गोलंदाजाचे वर्चस्व?
कधी अन् कुठे पाहाल सामना ?
विश्वचषकातील दुसरा सेमीफायनलचा सामना गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या दक्षिण आफ्रिाक आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्ड्न मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. 16 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता या दोन संघामध्ये लढत होणार आहे. त्याआधी दीड वाजता नाणेफेक होईल. स्टार स्पोर्ट्सवर हा सामना लाईव्ह पाहू शकतात.मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार या अॅपवर हा सामना मोफत पाहता येईल.
दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेंबा बावुमा (कर्णधार), रासी वान डेर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेविड मिलर, मार्को यॉन्सेन, गॅराल्ड कोएत्ज़ी, केशव महाराज, कगीसो रबाडा, लुंगी एनगिडी
ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन -
डेविड वार्नर, ट्रेविस हेड, मिशेल मार्श, स्टीव स्मिथ, जोश इंगलिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मिशेल स्टार्क, पॅट कमिंस (कर्णधार), एडम झम्पा आणि जोश हेजलवूड
ऑस्ट्रेलियाचा फायनलमध्ये प्रवेश
ऑस्ट्रेलियाचा फायनलमध्ये प्रवेश
सामन्यात रोमांच
जोश इंग्लिंशला बाद करत कोटत्जेनं दिला मोठा धक्का
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का
स्मिथच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसलाय. स्मिथ मोक्याच्या क्षणी 30 धावा काढून बाद झालाय. आता सर्व मदार जोश इंग्लिश याच्यावर आहे.
ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत
ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत परतलाय. ग्लेन मॅक्सवेल स्वस्तात बाद झाला.. कांरारुची सर्व मदार स्मिथवर
ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का
मार्नस लाबुशेन बाद झाला. ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का... लाबुशेन 18 धावा काढून बाद झालाय