SA Vs AUS WTC Final : साउथ आफ्रिका 'चॅम्पियन'! WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर थरारक विजय, ICC ट्रॉफीवर नाव कोरलं; टेम्बा बावुमाने 27 वर्षांचा 'चोकर्स'चा टॅग पुसला
South Africa Won WTC Final : ज्यांनी त्यांच्या क्रिकेट प्रवासात अनेकदा अंतिम टप्प्यावर येऊन हार पत्करली, त्याच दक्षिण आफ्रिकेने अखेर इतिहास रचला आहे.

SA Vs AUS WTC Final : ज्यांनी त्यांच्या क्रिकेट प्रवासात अनेकदा अंतिम टप्प्यावर येऊन हार पत्करली, त्याच दक्षिण आफ्रिकेने (South Africa Cricket Team) अखेर इतिहास रचला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025 च्या अंतिम सामन्यात टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर थरारक विजय मिळवत 27 वर्षांचा "चोकर्स" टॅग पुसून टाकला आणि आयसीसी ट्रॉफीवर दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं. टेम्बा बावुमा यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या 2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा चार दिवसांत 5 गडी राखून पराभव केला. यासह 1998 साली चॅम्पियन्स ट्रॉफी (South Africa last ICC Trophy win in 1998) जिंकल्यानंतर आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत विजय न मिळवू शकलेल्या दक्षिण आफ्रिकेने दुसरी आयसीसी ट्रॉफी जिंकली.
𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒 🏆🇿🇦
— ICC (@ICC) June 14, 2025
South Africa take home the 𝐌𝐚𝐜𝐞 👏#WTC25 #SAvAUS pic.twitter.com/Yy4C4AQEO7
रबाडाचा 'पंजा', पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला गुंडाळले....
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात ब्यू वेबस्टरने सर्वाधिक 72 धावा केल्या, ज्यात 11 चौकारांचा समावेश होता. माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने 66 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने सर्वाधिक पाच बळी घेतले, तर डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सनला तीन विकेट घेतले. फिरकी गोलंदाज केशव महाराज आणि एडेन मार्कराम यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतला आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या 212 धावांवर आटोपला.
Aiden Markram's ton steers the way for South Africa to a historic #WTC25 Final victory 🏆
— ICC (@ICC) June 14, 2025
How the final day unfolded ➡️ https://t.co/BjRy7oF0Sd pic.twitter.com/GZsC1iKddr
कमिन्ससमोर पहिल्या डावात द.आफ्रिकेच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या
पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची कामगिरीही निराशाजनक होती. परिणामी, संपूर्ण दक्षिण आफ्रिकन संघ 138 धावांवर ऑलआउट झाला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून डेव्हिड बेडिंगहॅमने सर्वाधिक 45 धावा केल्या. तर कर्णधार टेम्बा बावुमाने 84 चेंडूत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 36 धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने सहा विकेट घेतल्या, तर मिचेल स्टार्कला दोन यश मिळाले. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 74 धावांची आघाडी मिळाली.
दुसऱ्या डावात 'स्टार्क'चा चमत्कार
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाबद्दल बोलायचे झाले तर, कांगारू संघाचा स्कोअर एकेकाळी सात विकेटवर 73 धावा होता. येथून, यष्टीरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरी आणि मिचेल स्टार्क यांच्या शानदार फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया 207 धावांपर्यंत पोहोचू शकला. स्टार्कने 136 चेंडूत 58* धावा केल्या, ज्यामध्ये पाच चौकारांचा समावेश होता. अॅलेक्स कॅरीने 50 चेंडूत 5 चौकारांसह 43 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडानेही दुसऱ्या डावात शानदार गोलंदाजी केली आणि चार विकेट घेतल्या. तर लुंगी एनगिडीने तीन यश मिळवले. पहिल्या डावातील आघाडीमुळे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला 282 धावांचे लक्ष्य दिले.
मार्कराम अन् बावुमासमोर कांगारूंचे सर्व डाव फसले...
282 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 70 धावांवर आपला दुसरा विकेट गमावला. येथून एडेन मार्कराम आणि कर्णधार टेम्बा बावुमा यांनी तिसऱ्या विकेटसाठी 147 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे काम सोपे झाले. या भागीदारीदरम्यान मार्करामने 101 चेंडूत 11 चौकारांसह शतक पूर्ण केले. आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा मार्कराम पहिला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ठरला.
दुसरीकडे, हॅमस्ट्रिंग दुखापतीशी झुंजत असतानाही टेम्बा बावुमाने शानदार खेळी केली. बावुमाने 134 चेंडूत 66 धावा केल्या, ज्यामध्ये पाच चौकारांचा समावेश होता. विरोधी कर्णधार पॅट कमिन्सने बावुमाला धावबाद केले. आपल्या संघाचा विजय निश्चित केल्यानंतर मार्कराम आऊट झाला. त्याने 227 चेंडूत 136 धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली. या दरम्यान त्याच्या बॅटमधून 14 चौकार आले. मार्कराम बाद झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी फक्त सहा धावांची आवश्यकता होती. टेम्बा बावुमा यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला आहे. लॉर्ड्सवर अंतिम सामन्यात त्यांनी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा चार दिवसांत 5 गडी राखून पराभव केला.
After an early setback, Aiden Markram gets the chase back on track with an exquisite four 👌
— ICC (@ICC) June 14, 2025
Catch the action live on our official broadcasters, head to our stories for more 📲#Cricket #CricketReels #SAvAUS #WTC25 pic.twitter.com/6Yp4xioYM3




















