Smriti Mandhana Father News : लग्नसोहळ्यापूर्वी स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती बिघडली, सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
Smriti Mandhana Father Marathi News : भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचा विवाहसोहळा रविवारी सांगलीत संपन्न होणार होता.

Smriti Mandhana and Palash Muchhal Wedding : भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचा विवाहसोहळा रविवारी सांगलीत संपन्न होणार होता. काल रात्री तिचा मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला होता. यानंतर आज दुपारी तिचा लग्नसोहळा संपन्न होणार होता. परंतु, या लग्नसोहळ्यापूर्वी स्मृती मानधना हिच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे स्मृती मानधना हिच्या वडिलांना तातडीने सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या स्मृतीच्या वडिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
अचानक अॅम्ब्युलन्स आली अन् खळबळ उडाली
मिळालेल्या माहितीनुसार, लग्न समारंभादरम्यान स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती अचानक खालावली, ज्यामुळे पाहुणे आणि कुटुंबीयांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी म्हणून रुग्णवाहिका विवाहस्थळी बोलावण्यात आली आणि त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेनंतर विवाहस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले, सध्या स्मृतीच्या वडिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विवाह
सांगली येथील स्मृतीच्या फार्म हाऊसवर अगदी मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा होणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू गेल्या दोन दिवसांपासूनच सांगलीमध्ये दाखल झाल्या आहेत. आज लग्नाचा मुख्य सोहळा दुपारी चार वाजता सुरू होईल. या विवाह सोहळ्याला सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहतील अशी माहिती पोलिसांच्या कडून देण्यात आली आहे. तर आयसीसी अध्यक्ष जय शाह यांच्या उपस्थितीबद्दल मात्र शंका उपस्थित केली जातेय. ज्या ठिकाणी स्मृती मानधनाचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
2019 पासून प्रेम, आता विवाहबद्ध
स्मृती आणि पलाश 2019 पासून एकमेकांना डेट करत होते. सुरुवातीला दोघांनीही आपले रिलेशनशिप खाजगी ठेवले होते. 2024 मध्ये त्यांच्या नात्याची अधिकृत माहिती समोर आली. याच वर्षी पलाशने नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये सर्वांसमोर गुडघ्यावर बसून स्मृतीला प्रपोज केलं होतं, आणि तो रोमँटिक क्षणही व्हायरल झाला होता. यांचा अजून एक रोमँटिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये दोघेही सलमान खानच्या ‘सलाम-ए-इश्क’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणं तेनू लेके मैं जावांगा... या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत होते.
हे ही वाचा -





















