SL vs AUS: भरमैदानात उस्मान ख्वाजावर भडकला स्टीव्ह स्मिथ, व्हिडिओ पाहिल्यानंतरचं समजेल कारण!
SL vs AUS: ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेशी दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायला मैदानात उतरला आहे.
SL vs AUS: ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेशी दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायला मैदानात उतरला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना आज गॅलेच्या गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघानं ऑस्ट्रेलियाला प्रथम गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघानं श्रीलंकेला 212 धावांवर रोखलं.त्यानंतर या सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ 11 धावांवर रन आऊट होऊन माघारी परतला. त्यानंतर तो दुसऱ्या बाजुला उभा असलेल्या उस्मान ख्वाजावर भडकला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
स्टीव्ह स्मिथ ख्वाजावर का भडकला?
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 20 षटकात श्रीलंकडून रमेश मेंडिस गोलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. या षटकातील पहिल्याच चेंडू स्टीव्ह स्मिथच्या पॅडवर आदळला. त्यावेळी श्रीलंकेच्या संघानं एलबीडब्लूची अपील केली. मात्र, पंचांनी त्याला नाबाद घोषित केलं. त्यावेळी स्टीव्ह स्मिथनं एक धावा चोरण्याचा प्रयत्न केला. पण उस्मान ख्वाजा अर्ध्यातून माघारी परतला. ज्यामुळं स्टीव्ह स्मिथ रन आऊट झालाय. त्यानंतर तो भरमैदानात उस्मान ख्वाजावर भडकला.
पाहा व्हिडिओ-
Steve Smith usually doesn't lose his cool 👀#SLvAUS #stevesmith pic.twitter.com/sxKdJaYOK3
— A True Cric Fan (@atruecricfan) June 29, 2022
एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय
कसोटी मालिकेपूर्वी श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात आली. या मालिकेत श्रीलंकेच्या संघानं 3-2 नं मालिका खिशात घातली. महत्वाचं म्हणजे, 30 वर्षानंतर प्रथमच श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत पराभूत केलंय. यापूर्वी श्रीलंकेनं 1992 मध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 नं पराभव केला होता. एकदिवसीय मालिकेतील पराभवाची खपली भरून काढण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळायला मैदानात उतरला आहे. या मालिकेत कोणत्या संघाचं वर्चस्व पाहायला मिळतंय, हे मालिकेच्या शेवटीच स्पष्ट होईल.
हे देखील वाचा-