India Tour of England: भारताच्या इंग्लंड दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक; कधी, कुठे रंगणार एकदिवसीय आणि टी-20 मालिका?
भारतीय कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत इंग्लंडशी एकमात्र कसोटी सामना खेळला जाणार आहे. बर्मिंगहॅमच्या एजबस्टन क्रिकेट ग्राउंडवर येत्या 1 जुलैपासून या सामन्याला सुरुवात होणार आहे.
ENG vs IND: भारतीय कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत इंग्लंडशी एकमात्र कसोटी सामना खेळला जाणार आहे. बर्मिंगहॅमच्या (Birmingham) एजबस्टन क्रिकेट ग्राउंडवर येत्या 1 जुलैपासून या सामन्याला सुरुवात होणार आहे. यापूर्वीच कर्णधार रोहित शर्माची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. त्याच्याजागी मयांक अग्रवालची (Mayank Agarwal) संघात वर्णी लागलीय. बीसीसीआय रोहित शर्माच्या फिटनेसवर बारीक लक्ष ठेवून आहे. भारत आणि इग्लंड यांच्यातील सामने कधी आणि कुठे रंगणार? याची संपूर्ण माहिती मिळवा.
इंग्लंडविरुद्ध भारत रिशेड्युल कसोटी सामना-
सामना | तारीख | ठिकाण |
पाचवा कसोटी सामना | 1 जुलै | बर्मिंगहॅम |
इंग्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 7 जुलै | एजेस बाउल |
दुसरा टी-20 सामना | 9 जुलै | एजबॅस्टन |
तिसरा टी-20 सामना | 10 जुलै | ट्रेंट ब्रिज |
इंग्लंड- भारत एकदिवसीय मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 12 जुलै | ओव्हल |
दुसरा एकदिवसीय सामना | 14 जुलै | लॉर्ड्स |
तिसरा एकदिवसीय सामना | 17 जुलै | मँचेस्टर |
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ:
मयांक अगरवाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा. रोहित शर्मा (कोरोनाबाधित)
हे देखील वाचा -
- Hardik Pandya: कर्णधार हार्दिकचं धोनीच्या पावलावर पाऊल, आयर्लंडविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर कौतुकास्पद काम!
- India Vs England: राहुल द्रविडच्या नेतृत्वात इंग्लंडमध्ये फडकलाय भारताचा तिरंगा, आता प्रशिक्षक म्हणून इतिहास रचणार?
- Kanhaiya Lal Murder Case: कन्हैया लाल हत्याकांडप्रकरणी इरफान पठाणची संतप्त प्रतिक्रिया