KL Rahul: जर्मनीत पाठीवर शस्त्रक्रिया केलेल्या केएल राहुलच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट
KL Rahul Fitness Update: भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुलनं (KL Rahul) जर्मनीमध्ये त्याच्या पाठीवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्याच्या फिटनेसबद्दल माहिती दिली आहे.
KL Rahul Fitness Update: भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुलनं (KL Rahul) जर्मनीमध्ये त्याच्या पाठीवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्याच्या फिटनेसबद्दल माहिती दिली आहे. याचबरोबर राहुलनं त्याच्या चाहत्यांचेही आभार मानले आहेत. महत्वाचं म्हणजे, नुकतीच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत केएल राहुलकडं भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. परंतु, पाठीच्या दुखापतीमुळं केएल राहुलला या मालिकेतून बाहेर पडावं लागलं होतं. त्यानंतर या मालिकेत भारताचा युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतनं (Rishabh Pant) भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. या मालिकेतील अखेरचा सामना पावसामुळं रद्द झाल्यानं ही मालिका 2-2 नं बरोबरीत सुटली.
केएल राहुलचं ट्वीट-
केएल राहुल काय म्हणाला?
राहुलने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांचं समर्थन आणि प्रार्थना केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच तो बरा होत असल्याची पुष्टी केली. सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये केएल राहुलनं लिहिलंय की, "सर्वांना नमस्कार, काही आठवडे कठीण होते पण शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मी बरा होत आहे आणि माझ्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तुमचा पाठिंबहा आणि प्रार्थनांबद्दल धन्यवाद, लवकरच भेटू."
अथियाकडून केएल राहुलचा फोटो शेअर
बीसीसीआयने केएल राहुलला वाढत्या दुखापतीमुळं जर्मनीला पाठवलं होतं. या दुखापतीमुळं त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेसह येत्या 1 जुलैपासून इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या रिशेड्युल कसोटी सामन्याला मुकावं लागलंय. त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टीही केएल राहुलसोबत जर्मनीला गेली आहे. यशस्वी दुखापतीनंतर अथियानं तिच्या इन्स्टा स्टोरीवर केएल राहुलचा फोटो शेअर केलाय.
हे देखील वाचा-