(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Sharma: रोहित शर्मा बर्मिंगहॅम कसोटीत खेळणार की नाही? कोरोना चाचणीबाबत महत्वाची माहिती समोर
Rohit Sharma Health Update: भारत आणि इंग्लंड यांच्यातील (IND vs ENG 5th Test) रिशेड्युल कसोटी सामन्याला येत्या 1 जुलैपासून सुरुवात होणार आहे.
Rohit Sharma Health Update: भारत आणि इंग्लंड यांच्यातील (IND vs ENG 5th Test) रिशेड्युल कसोटी सामन्याला येत्या 1 जुलैपासून सुरुवात होणार आहे. यापूर्वी रोहितची शर्माची (Rohit Sharma) कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (COVID-19) आल्यानं भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. एवढेच नव्हे तर, बर्मिंगहॅम (Birmingham) कसोटी सामन्यात रोहित शर्मा खेळणार की नाही? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर रोहित शर्माबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे. रोहितची आज पुन्हा कोरोना चाचणी केली जाणार आहे. या चाचणीत रोहित पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला बर्मिंगहॅम कसोटी सामन्यातून नक्कीच वगळलं जाईल.
दरम्यान, 26 जून रोजी रोहित शर्माची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती बीसीसीआयनं ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. रोहितची काल सकाळी आणि रात्रीही कोविड-19 चाचणी करण्यात आली. या चाचणीच्या निकालाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. आज पुन्हा रोहितची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती क्रिकइन्फोनं दिलीय.
राहुल द्रविड काय म्हणाला?
भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी रोहित शर्मा अद्याप बर्मिंगहॅम कसोटीतून बाहेर नसल्याचं वक्तव्य केलं होतं. बुधवारी पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, "आमची वैद्यकीय टीम रोहितवर बारीक लक्ष ठेवून आहे. तो अद्याप कसोटीतून बाहेर पडलेला नाही. बर्मिंगहॅम कसोटीचा भाग होण्यासाठी त्याला कोविड-19 निगेटिव्ह रिपोर्टची आवश्यकता असेल. आमच्याकडे अजून काही तास शिल्लक आहेत", असं द्रविडनं म्हटलं होतं.
रोहितच्या अनुपस्थित कर्णधारपदाची जबाबदारी कोण संभाळणार?
रोहित गैरहजर राहिला तर टीम इंडियाचे कर्णधार कोण असेल याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही माहिती देण्यात आलेले नाही. दरम्यान, मार्चमध्ये झालेल्या श्रीलंका कसोटी मालिकेत उपकर्णधार असलेल्या जसप्रीत बुमराह बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची शक्यता आहे. भारताकडे ऋषभ पंत, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीसारखे पर्याय असले तरी क्रिकेट तज्ज्ञ बुमराहला इथल्या शर्यतीत पुढं असल्याचं सांगत आहेत.
हे देखील वाचा-
- India Tour of England: भारताच्या इंग्लंड दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक; कधी, कुठे रंगणार एकदिवसीय आणि टी-20 मालिका?
- Malaysia Open 2022: विजयानंतर पीव्ही सिंधू पुढच्या फेरीत, सायना नेहवाल पराभूत!
- ICC T20 Rankings: टी-20 क्रमवारीत दीपक हुडाची मोठी झेप; संजू सॅमसन, हर्षल पटेलाही फायदा! विराट- रोहितचं काय?