SL vs AFG Asia Cup 2025: अफगाणिस्तानविरुद्ध सामना सुरु असताना श्रीलंकेच्या खेळाडूच्या वडिलांचं निधन; त्याच्याच षटकात नबीने टोलावले 5 षटकार
SL vs AFG Asia Cup 2025: आशिया चषक 2025 स्पर्धेतील साखळी सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला. श्रीलंकने या विजयासह सुपर-4 मधील स्थानही निश्चित केले.

SL vs AFG Asia Cup 2025: आशिया चषक 2025 स्पर्धेतील साखळी सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा 6 विकेट्सने पराभव (SL vs AFG Asia Cup 2025) केला. श्रीलंकने या विजयासह सुपर-4 मधील स्थानही निश्चित केले. तर श्रीलंकेच्या या विजयामुळे ग्रुप-ब मधील बांगलादेशचा संघही सुपर-4 मध्ये दाखल झाला आहे. दरम्यान, श्रीलंका आणि अफगाणिस्तानचा सामना सुरु असताना श्रीलंकेचा खेळाडू दुनिथ वेल्लालेजवर (Dunith Wellalage) दुःखाचा डोंगर कोसळला. सामना सुरु असताना दुनिथ वेल्लालागेच्या वडिलांचे निधन झाले. मात्र वडिलांच्या निधनानंतर दुनिथ वेल्लालेज खंबीरपणे सामना खेळत होता.
श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू दुनिथ वेल्लालेजच्या वडिलांचे अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान निधन झाले. वेल्लालेजला सामन्यादरम्यानच याची माहिती देण्यात आली. श्रीलंकेच्या माध्यमांच्या वृत्तानुसार, दुनिथचे वडील सुरंगा वेल्लालेज यांना हृदयविकाराचा झटका आला. दरम्यान, अफगाणिस्तान फलंदाजी करत असताना शेवटच्या षटकांत दुनिथ वेल्लालेजसा गोलंदाजी देण्यात आली होती आणि याच षटकांत अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने पाच षटकार टोलावले.
Heartbreaking scene 💔 Moments after the match, Sri Lanka coach Sanath Jayasuriya & team manager informed young Dunith Wellalage about his father’s sudden passing at 54 due to a heart attack. Strength to Dunith & his family in this tragic time🙏🏻#AFGvSL pic.twitter.com/5WWfxblw1u
— 𝔸𝕁𝔸𝕐 𝕁𝔸ℕ𝔾𝕀𝔻 (@iamajayjangirr) September 18, 2025
मोहम्मद नबीने घातला धुमाकूळ-
आशिया कप 2025 मध्ये अफगाणिस्तानच्या अनुभवी फलंदाज मोहम्मद नबीने श्रीलंकेविरुद्ध तुफानी अर्धशतकी खेळी खेळत धुमाकूळ घातला. नबीने केवळ 22 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 60 धावा ठोकल्या. यावेळी त्याने दुनिथ वेल्लालागेच्या एका षटकात सलग 5 षटकार ठोकण्याचा विक्रम केला. 71 धावांवर 5 गडी बाद झाल्यानंतर नबी मैदानात उतरला. त्याने राशिद खान (24) सोबत सातव्या विकेटसाठी 35 धावांची महत्त्वाची भागीदारी रचली. 18 षटकांनंतर अफगाणिस्तानचा स्कोर 120/7 होता, तेव्हा नबी 10 चेंडूत 14 धावांवर खेळत होता. यानंतर त्याने 19व्या षटकात चमीराच्या गोलंदाजीवर 19 धावा काढल्या आणि अखेरच्या षटकात वेल्लालागेला पाच षटकार मारले.
सुपर-4 चं समीकरण ठरलं-
भारत आणि पाकिस्तानने आशिया कप 2025 च्या सुपर फोरमध्ये ग्रुप अ मधून आधीच पात्रता मिळवली होती. त्यानंतर ग्रुप ब मधून श्रीलंका आणि बांगलादेशचा संघ सुपर-4 मध्ये दाखल झाला.
सुपर-4 आणि अंतिम सामना
20 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध बांगलादेश
21 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
23 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
24 सप्टेंबर – भारत विरुद्ध बांगलादेश
25 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश
26 सप्टेंबर – भारत विरुद्ध श्रीलंका
28 सप्टेंबर – अंतिम सामना
हे ही वाचा -





















