IND vs BAN 1st ODI: बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्माची मोठी प्रतिक्रिया
IND vs BAN 1st ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात रविवारी पहिला एकिदवसीय सामना खेळण्यात आला.
IND vs BAN 1st ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात रविवारी पहिला एकिदवसीय सामना खेळण्यात आला. या रोमहर्षक सामन्यात भारताला एका विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागलाय. या पराभवासह भारतीय संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 नं पिछाडीवर गेलाय. मेहंदी हसन आणि मुस्तफिजुर रहमान भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरले. दोघांनी दहाव्या विकेट्ससाठी नाबाद 51 धावांची खेळी करत बांगलादेशला विजय मिळवून दिला. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पराभवानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) मोठी प्रतिक्रिया दिली. "खराब खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी फलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे", असं रोहित शर्मानं म्हटलंय.
सामन्याच्या प्रजेंटेशन सेरेमनीदरम्यान रोहित शर्मा म्हणाला की,"खेळपट्टी थोडी आव्हानात्मक होती. या खेळपट्टीवर चेंडूला टर्न मिळत होता. फलंदाजी कशी करायची? हे समजून घ्यायला हवे. कोणतंही कारण नकोय. अशा परिस्थितीची आपल्याला सवय झालीय.गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी कशी करायची? याचा विचार करायला हवा. हे लोक अशा परिस्थितीत खेळून मोठे झाले आहेत. हे सर्व दबाव हाताळण्याबद्दल आहे."
ट्वीट-
Things went right down to the wire but it was Bangladesh who won the first ODI.#TeamIndia will look to bounce back in the second ODI of the series 👍 #BANvIND
— BCCI (@BCCI) December 4, 2022
Scorecard 👉 https://t.co/XA4dUcD6iy pic.twitter.com/Ko3Snyqdpp
रोहित शर्माकडून गोलंदाजांचं कौतूक
कर्णधार रोहित शर्मा मते भारतानं बांगलादेशसमोर ठेवलेलं लक्ष्य कमी पडलं.भारताच्या 30-40 धावा कमी पडल्या. आम्ही केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर भारताची धावसंख्येत भर घालू शकले असते. पण आम्ही मिडल ओव्हर्समध्ये विकेट गमावले आहेत. ज्यामुळं भारतीय संघाला पुनरागमन करता आलं नाही. पण रोहित शर्मानं गोलंदाजांचं मनभरून कौतूक केलं. हा खूप रोमहर्षक सामना ठरला. आम्ही फलंदाजी चांगली नाही केली.पण गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत बांगलादेशच्या संघावर दबाव निर्माण केला.
भारत 1-0 नं पिछाडीवर
पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूनं लागला. त्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसननं भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. बांगलादेशच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय संघ संघर्ष करताना दिसला. भारतीय संघ निर्धारित 50 षटकात 186 धावांवर ऑलआऊट झाला. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या संघाचीही दमछाक झाली. मोहम्मद सिराज, कुलदीप सेनच्या भेदक माऱ्यापुढं बांगलादेशच्या संघानं गुडघे टेकले. बांगलादेशनं 136 धावांवर हसन महमूदच्या रुपात नववी विकेट गमावली. परंतु, मेहंदी हसन आणि मुस्तफिजूर रहमानची महत्वपूर्ण भागिदारी करत बांगलादेशला विजय मिळवून दिला.
हे देखील वाचा-