IND Vs ENG 1st Test : गिलला टार्गेट करत इंग्लंडचा माइंड गेम सुरू, कसोटी मालिकेआधीच तापलं वातावरण; कोण आहे 'तो' ज्याने टीम इंडियाला डिवचलं?
Shubman Gill India Test Captain : भारत विरुद्ध इंग्लंड पहिली कसोटी 20 जूनपासून (IND vs ENG 1st Test Date) सुरू होत आहे.

India VS England Test Series : भारत विरुद्ध इंग्लंड पहिली कसोटी 20 जूनपासून (IND vs ENG 1st Test Date) सुरू होत आहे. विराट कोहली (Virat Kohli Retirement) आणि रोहित शर्मा यांच्या कसोटी निवृत्तीनंतर टीम इंडियाची ही पहिली रेड-बॉल मालिका असेल. विशेषतः नवीन कर्णधार शुभमन गिलसाठी हे एक नवीन आव्हान असेल, जो पहिल्यांदाच कसोटी संघाचे नेतृत्व करणार आहे.
कर्णधार म्हणून शुभमन गिलच्या खांद्यावर दुहेरी जबाबदारी असेल. संघाला एकत्र बांधून नेत नेतृत्व करायचं आणि त्याच वेळी वैयक्तिक कामगिरीतही सातत्य राखायचं. दोन्ही पातळ्यांवर यशस्वी होण्याचा दबाव त्याच्यावर असेल. याआधी गिलला टार्गेट करत इंग्लंडचा माइंड गेम सुरू झाला आहे. आता इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू निक नाइटने पहिल्या कसोटीपूर्वी एक मोठे विधान केले आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, निक नाइट म्हणाला की, शुभमन गिल कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करू शकेल, परंतु प्रश्न असा आहे की तो कर्णधार म्हणून त्याची वैयक्तिक कामगिरी कशी सुधारू शकेल. अचानक त्याच्यावर इतर 10 खेळाडूंची जबाबदारी आली आहे. त्यामुळे संपूर्ण संघाला एकत्र घेऊन जाणे गिलसाठी एक मोठे आव्हान असेल.
निक नाईट म्हणाला, "शुभमन गिल प्रशिक्षकांच्या मदतीने त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकेल का आणि तो कर्णधारपदाची जबाबदारी योग्यरित्या पार पाडू शकेल का? मालिकेतील सर्वात महत्त्वाच्या क्षणी तो निर्णय कसा घेऊ शकेल, मला त्याचे उत्तर माहित नाही. मला वाटत नाही की तो स्वतः या प्रश्नाचे उत्तर शोधू शकला आहे. पण मालिका जसजशी पुढे जाईल तसतसे तो समजून घेईल."
गिल इंग्लंडच्या निशाण्यावर
इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूचा असा विश्वास आहे की, इंग्लंडचा संघ कोणत्याही परिस्थितीत शुभमन गिलला लक्ष्य करेल. तो म्हणाला, "ज्या संघाचा कर्णधार दबावाखाली असुरक्षित वाटत असेल त्यापेक्षा कमकुवत संघ असू शकत नाही. याचा ड्रेसिंग रूमवर खूप खोल परिणाम होतो. म्हणूनच गिल इंग्लंडच्या निशाण्यावर असेल. इंग्लंडचा संघ गिलला अस्वस्थ वाटावे असे वाटेल."
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, ध्रुव जुरेल.





















