एक्स्प्लोर

Shubman Gill : ऑस्ट्रेलियात फेल, इंग्लंडविरुद्ध टीम इंडियातून डच्चू... स्टार खेळाडूने अखेर उचलले मोठे पाऊल!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघात मोठी उलथापालथ सुरू आहे.

Shubman Gill To Play Ranji Trophy : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघात मोठी उलथापालथ सुरू आहे. यामुळे भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला संघही जाहीर केलेला नाही. ऑस्ट्रेलियातील खराब कामगिरीनंतर भारतीय संघावर प्रचंड टीका झाली. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह इतर खेळाडूंनाही देशांतर्गत क्रिकेट न खेळल्याबद्दल टार्गेट करण्यात आले. 

दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाचा स्टार खेळाडू शुभमन गिलवरही ऑस्ट्रेलियातील खराब कामगिरीबद्दल प्रचंड टीका झाली. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाच्या टी-20 संघातून पण वगळण्यात आले, दरम्यान, शुभमन गिलने मोठा निर्णय घेतला आहे. खरंतर, त्याने रणजी ट्रॉफी खेळण्याचा निर्णय घेतल्याची बातमी समोर येत आहे. 

ऑस्ट्रेलियात शुभमन गिलने 3 सामने आणि 5 डावात 93 धावा केल्या. अशा परिस्थितीत, इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी निवड न झालेल्या गिलने पंजाबकडून रणजी ट्रॉफी सामने खेळण्याचा प्लान आखला आहे. इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, शुभमन गिल कर्नाटकविरुद्ध सामन्यात पंजाबकडून खेळताना दिसेल. गिल ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्या चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करू शकला नाही. तीन कसोटी सामन्यांमध्ये त्याचे धावसंख्या 31, 28, 1, 20 आणि 13 होती. त्यामुळे गिलच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

गिलसाठी 2024 हे वर्ष धमाकेदार राहिले...

2024 हे वर्ष शुभमन गिलसाठी धमाकेदार होते. तो भारताकडून कसोटीत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. ऑस्ट्रेलिया दौरा जर आपण बाजूला ठेवला, तर त्याने भारतात चमकदार कामगिरी केली. त्याने 12 सामन्यांच्या 22 डावात 3 शतके आणि 3 अर्धशतकांसह 866 धावा केल्या. पण आशियाबाहेर गिलची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पाचही शतके आशियामध्ये झळकावली आहेत. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये फक्त 2 अर्धशतके केली आहेत.

भारताच्या टी-20 संघातून डच्चू

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आगे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघात शुभमन गिलला संधी मिळाली नाही. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन सलामीवीर म्हणून खेळताना दिसतील. याशिवाय, यशस्वी जैस्वाल हा देखील एक सलामीचा पर्याय आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर गिलला कर्णधार बनवण्यात आले होते तर श्रीलंका दौऱ्यावर तो उपकर्णधार होता.

हे ही वाचा -

गौतमी गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Beed News: बीडमध्ये आंदोलनाची धग वाढण्याचे संकेत, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी
मोठी बातमी: बीड जिल्ह्यात आज रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 14 January 2025Balasaheb Thackeray Smarak : बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवणार?Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Beed News: बीडमध्ये आंदोलनाची धग वाढण्याचे संकेत, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी
मोठी बातमी: बीड जिल्ह्यात आज रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय
गौतमी गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
Inflation Rate : सर्वसामान्यांना दिलासा, डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? सर्वांचं लक्ष 
डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? फेब्रुवारीत बैठक
Nashik News: मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छ. संभाजीनगरमध्ये तलवारी घेऊन पाठलाग, भररस्त्यात एकावर वार, हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराची दहशत
छ. संभाजीनगरमध्ये भररस्त्यात थरारक घटना, तलवार घेऊन फळविक्रेत्याचा पाठलाग, दहशतीने नागरिक धास्तावले
Embed widget