एक्स्प्लोर

Shreyas Iyer News : श्रेयस अय्यरने केली घोडचूक, थेट कर्णधारपदाची ऑफर नाकारली, नेमकं काय घडलं? जाणून घ्या इनसाईड स्टोरी

आशिया कप 2025 साठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून यात मोठे बदल दिसून आले आहेत.

Shreyas Iyer Duleep Trophy West Zone : आशिया कप 2025 साठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून यात मोठे बदल दिसून आले आहेत. स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला संघातून वगळण्यात आले, तर जवळपास वर्षभरानंतर शुभमन गिलची टी-20 संघात पुनरागमन झाले आहे. एवढेच नाही, तर गिलवर विश्वास दाखवत त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे.दरम्यान, श्रेयस अय्यरकडून मोठी घोडचूक झाली आहे. त्याने दुलीप ट्रॉफीत वेस्ट झोन संघाच्या कर्णधारपदाची ऑफर नाकारली. पण या निर्णयामागचं खरं कारण काय? जाणून घ्या संपूर्ण इनसाईड स्टोरी....

श्रेयस अय्यरने वेस्ट झोनच्या कर्णधारपदाची ऑफर नाकारली

दरम्यान, श्रेयस अय्यरने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दुलीप ट्रॉफीत वेस्ट झोनचे नेतृत्व करण्यास त्याने नकार दिला, त्यानंतर निवड समितीने ही जबाबदारी ऑलराउंडर शार्दूल ठाकूरकडे सोपवली. ठाकूरने आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वेस्ट झोन निवड समितीचे प्रमुख संजय पाटील (मुंबईचे मुख्य निवडकर्ता) यांनी सुरुवातीला अय्यरला कर्णधारपदाची ऑफर दिली होती. मात्र, अय्यरने ती नाकारली आणि स्वतःला खेळाडू म्हणून उपलब्ध करून दिले. त्यानंतर शार्दूल ठाकूरला ही संधी मिळाली.

आशिया कपमध्ये निवडची वाट पाहत होता श्रेयस अय्यर…  

श्रेयस अय्यरला आशिया कपसाठी संघात स्थान मिळेल, अशी त्याची अपेक्षा होती. यासाठी त्याने वैयक्तिक प्रशिक्षक प्रवीण आमरे यांच्या मार्गदर्शनाखाली बांद्रा-कुर्ला संकुलातील एमसीए इनडोअर सुविधा आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडियात पांढऱ्या चेंडूच्या सरावाला सुरुवात केली होती. आशिया कप 9 सप्टेंबरपासून यूएईत सुरू होणार असल्यामुळे 4 ते 7 सप्टेंबरदरम्यान बंगळुरूमध्ये होणाऱ्या दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीसाठी अय्यर उपलब्ध राहणार नव्हता. मात्र, राष्ट्रीय निवड समितीने त्याला आशिया कपच्या 15 जणांच्या संघात तर संधी दिलीच नाही, शिवाय राखीव खेळाडूंमध्येही त्याचा समावेश केला नाही.

शार्दूल ठाकूर मुंबई रणजी संघाचं करणार नेतृत्व

दरम्यान, शार्दूल ठाकूर मुंबई रणजी संघाचं नेतृत्व करताना दिसू शकतो. अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने नुकतेच रणजी कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. ठाकूरने मागील रणजी हंगामात उत्कृष्ट कामगिरी करत 9 सामन्यांत 35 बळी घेतले, तसेच 505 धावा (एक शतक आणि चार अर्धशतकांसह) काढल्या होत्या. त्याच्या या दमदार कामगिरीच्या जोरावरच त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले.
 
दुलीप ट्रॉफीचे सामने 28 ऑगस्टपासून बंगळुरूतील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे सुरू होत असून अंतिम सामना 11 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. मुंबईचे नव्याने नियुक्त अंडर-19 प्रशिक्षक किरण पोवार यांना वेस्ट झोनच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हे ही वाचा -

Cheteshwar Pujara Retirement : 'टेस्ट स्पेशालिस्ट' चेतेश्वर पुजाराची क्रिकेटमधून निवृत्ती घोषणा; टीम इंडियाची आणखी एक भिंत ढासळली

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Meenakshi Shinde : 'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...

व्हिडीओ

Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Raj Thackeray Majha Katta: भाजपचा मुंबईवर डोळा, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Meenakshi Shinde : 'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
Vishwas Abaji Patil: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
Gold Rate : सोन्याच्या दरात 1752 रुपयांची वाढ, चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, 4219 रुपयांनी दरात वाढ, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Gold Rate : सोन्याच्या दरात 1752 रुपयांची वाढ, चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, 4219 रुपयांनी दरात वाढ
Tara Sutaria Veer Paharia Breakup: कॉन्सर्टमधील 'तो' व्हिडिओ भारी पडला, तारा अन् वीर पहारियानं घेतला नातं संपवण्याचा निर्णय? ब्रेकअपच्या चर्चांनी चाहतेही शॉक
कॉन्सर्टमधील 'तो' व्हिडिओ भारी पडला, तारा अन् वीर पहारियानं घेतला नातं संपवण्याचा निर्णय? ब्रेकअपच्या चर्चांनी चाहतेही शॉक
Stranger Things season 5 episode 9 update: नेटफ्लिक्सवर स्ट्रेंजर थिंग्सचा आणखी एक एपिसोड येणार? तो शेवट खोटा, Vecna चा डाव कोणालाच कळला नाही?
नेटफ्लिक्सवर स्ट्रेंजर थिंग्सचा आणखी एक एपिसोड येणार? तो शेवट खोटा, Vecna चा डाव कोणालाच कळला नाही?
Embed widget