एक्स्प्लोर

Cheteshwar Pujara Retirement : 'टेस्ट स्पेशालिस्ट' चेतेश्वर पुजाराची क्रिकेटमधून निवृत्ती घोषणा; टीम इंडियाची आणखी एक भिंत ढासळली

Cheteshwar Pujara Announces Retirement News : चेतेश्वर पुजाराने सोशल मीडियावरून आपल्या क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

Cheteshwar Pujara Retirement all Forms of Indian Cricket : महान फलंदाज राहुल द्रविड यांच्या नंतर जर भारताच्या कसोटी संघाची नवी "भिंत" म्हणून कोणाला ओळखलं जात असेल, तर तो खेळाडू म्हणजे चेतेश्वर पुजारा. पण आता ही भिंतही ढासळली आहे. कारण, चेतेश्वर पुजाराने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच व्यावसायिक घरेलू क्रिकेटमध्येही दिसणार नाही. चेतेश्वर पुजाराने भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2023 मध्ये खेळला होता. 2023 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले.

चेतेश्वर पुजाराने सोशल मीडियावर पोस्ट करताना काय लिहिले?

चेतेश्वर पुजारा याने सोशल मीडियावरून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्याने एक भावनिक पत्र लिहिलं आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं की, "भारतीय जर्सी परिधान करणं, राष्ट्रगीत गाणं आणि प्रत्येक वेळी मैदानावर उतरताना आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करणं, या सर्व अनुभवांना शब्दांत मांडणं अशक्य आहे. 

पुढे त्याने लिहिले की, पण म्हणतात ना, प्रत्येक चांगल्या गोष्टीचा एक शेवट असतो, आणि आता तो आला आहे. मी भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपणा सर्वांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!"

चेतेश्वर पुजाराची कारकीर्द

 चेतेश्वर पुजाराने 2010 मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून 2023 पर्यंत त्याने 103 कसोटी आणि फक्त 5 एकदिवसीय सामने खेळले. 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये फक्त 15 धावा केल्या. तो 2013 ते 2014 पर्यंत या स्वरूपात खेळला. त्याला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही संधी मिळाली नाही. 

त्याच वेळी, चेतेश्वर पुजाराने 103 कसोटी सामन्यांमध्ये 7195 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 19 शतके, 35 अर्धशतके आणि 3 द्विशतकांचा समावेश आहे. एका दशकाहून अधिक काळ, चेतेश्वर पुजाराला भारताच्या कसोटी संघाचा कणा म्हटले जात असे आणि अनेक प्रसंगी त्याने भारतीय संघाचा झेंडा उंचावला.

हे ही वाचा -

IND vs PAK Asia Cup : दोन्ही देशांच्या खेळाडूंनी मर्यादेत राहावं, आशिया कपमधील IND vs PAK सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, कोण जिंकणार तेही सांगितलं

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Donald Trump : पुढच्या वर्षी G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला नो एंट्री, त्यांना मिळणार सर्व अनुदान थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प संतापले
डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, पुढील वर्षी G-20 चं निमंत्रण नसणार, अनुदान थांबवणार
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
Nitin-Kanchan Gadkari Majha Maha Katta : राजकारण कशाशी खातात मला माहित नव्हतं, कांचन गडकरी म्हणाले
Nitin Gadkari Majha Maha Katta : राजकारण वाईटाकडे का जातंय? नितिन गडकरींनी माध्यमांचं काम सांगितलं
Nitin-kanchan Gadkari Majha Maha Katta:मुलाने नितीन गडकरींचे पाय बांधले,कांचनाताईंनी सांगितला किस्सा
Mahayuti Politics : महायुतीचा सस्पेन्स, शिंदेंचा डिफेन्स! रविंद्र चव्हाणांच्या विधानाचं गूढ वाढलं! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Donald Trump : पुढच्या वर्षी G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला नो एंट्री, त्यांना मिळणार सर्व अनुदान थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प संतापले
डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, पुढील वर्षी G-20 चं निमंत्रण नसणार, अनुदान थांबवणार
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Jain Muni Nilesh Chandra Maha Katta: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video: 'पण तुम्ही चापट मारणार असाल, तर आम्ही मारवाडी...' जैन मुनी निलेश चंद्र राज ठाकरेंना मराठीच्या वादावर काय काय म्हणाले?
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
Video : हातात पेट्रोल घेऊन आला, बाॅयफ्रेंडनं नर्स गर्लफ्रेंडसमोर स्वतःला पेटवलं, जळत्या अवस्थेत रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्यानंतही जिवंत जळत राहिला
SMAT : अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर रोमांचक विजय
अभिषेक शर्माला दोनदा बाद केलं, अंशुल कंबोजनं करुन दाखवलं, सुपर ओव्हरमध्ये हरियाणाचा पंजाबवर विजय
Ramraje Naik Nimbalkar :  प्रोटोकॉल बाजूला ठेवून आलो,  मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
मी कोणत्या पार्टीत यावर मुंबईत चर्चा होईल, त्यांना एकच सांगेन... : रामराजे नाईक निंबाळकर
Embed widget