Women World Cup Semi Finals Schedule : पहिल्या स्थानासाठी 2 संघामध्ये शर्यत, सेमीफायनलचं वेळापत्रक आज होणार जाहीर; टीम इंडिया कोणाशी अन् कधी भिडणार?
Australia vs South Africa World Cup 2025 : ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि भारत या चार संघांनी महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले आहे.

ICC Women Cricket World Cup Semi Finals Schedule : ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि भारत या चार संघांनी महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. मात्र अजूनही कोणत्या संघाचा सामना कुणाशी होणार हे स्पष्ट झालेले नाही. कारण टॉप-4 मधील प्रत्येक संघाचा एक-एक सामना बाकी आहे. भारताचा शेवटचा लीग सामना बांगलादेशविरुद्ध आहे. हा सामना भारत जिंकला तरी त्याची स्थिती चौथ्या क्रमांकावरच राहणार आहे.
आज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa World Cup 2025) यांच्यातील महत्त्वाचा सामना ठरणार आहे. या सामन्याचा निकाल ठरवेल की लीग स्टेजमध्ये नंबर-1 वर कोणाता संघ असेल. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यानंतरच महिला विश्वचषक 2025 च्या उपांत्य फेरीचं वेळापत्रक स्पष्ट होईल.
All to play for with top spot on the line at #CWC25 👀
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 25, 2025
How to watch ➡️ https://t.co/MNSEqhJP29 pic.twitter.com/sgWRujXI8k
भारताचा सामना कोणाशी होणार?
भारत चौथ्या स्थानी असल्याने हे निश्चित झाले आहे की हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया 29 ऑक्टोबर रोजी पहिला उपांत्य सामना खेळणार आहे. मात्र प्रतिस्पर्धी कोण असेल, हे आजच्या सामन्यावर अवलंबून आहे.
उपांत्य फेरी-1 : लीग टप्प्यातील पहिला क्रमांक विरुद्ध चौथा क्रमांक
उपांत्य फेरी-2 : दुसरा क्रमांक विरुद्ध तिसरा क्रमांक
म्हणूनच, आज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जो संघ विजय मिळवून पहिल्या स्थानावर पोहोचेल, त्याच संघाशी भारत 29 ऑक्टोबरला भिडणार आहे. पराभूत संघ इंग्लंडविरुद्ध 30 ऑक्टोबरला दुसऱ्या उपांत्य सामन्यात खेळेल.
The four semi-finalists are locked in at #CWC25 and there are some enticing potential matchups for the knockout stages 💪
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 25, 2025
Details 🔽https://t.co/NHnqp7UX6F
पाकिस्तानची निराशाजनक कामगिरी
पाकिस्तान महिला संघ या विश्वचषकात सर्वात कमजोर ठरला. संपूर्ण लीग टप्प्यात संघाला एकही विजय मिळवता आला नाही. पाकिस्तानने 7 पैकी 4 सामने गमावले, तर 3 सामने पावसामुळे रद्द झाले. पहिल्याच सामन्यात बांगलादेशविरुद्ध अनपेक्षित पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा फॉर्म घसरतच गेला. तरीही संघाने गुणतालिकेत सातव्या स्थानी आपला प्रवास संपवला. सर्वात तळात म्हणजे आठव्या क्रमांकावर बांगलादेशाचा संघ आहे.
हे ही वाचा -
















