एक्स्प्लोर

IND vs ENG 3rd T20 : कॅप्टनचा संयम सुटला! इंग्लंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर श्रेयस अय्यरचा थेट इशारा; म्हणाला, आता खेळाडूंना...

Shreyas Iyer IND vs ENG 3rd T20 : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताला 125 धावांनी दारूण पराभवाचा सामना करावा लागला.

Shreyas Iyer IND vs ENG 3rd T20 : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताला 125 धावांनी दारूण पराभवाचा सामना करावा लागला. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय टी-20 संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरचा संयम सुटला असून, त्याने खेळाडूंना कडक शब्दांत सुनावले आहे. "आता प्रत्येक खेळाडूला स्वतःची जबाबदारी घ्यावीच लागेल," अशा स्पष्ट शब्दांत अय्यरने आपला संताप व्यक्त केला. ट्रेंटब्रिज येथे झालेल्या या सामन्यातील टीम इंडियाच्या कामगिरीला त्याने अत्यंत खराब असे संबोधले आहे. या सामन्यात इंग्लंडने दिलेल्या 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या 11.4 षटकांत 76 धावांवर गारद झाला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताची ही दुसरी सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली आहे, तर धावांच्या दृष्टीने हा भारताचा आजवरचा सर्वात मोठा आणि मानहानीकारक पराभव आहे.

पराभवानंतर काय म्हणाला कर्णधार श्रेयस अय्यर? (Shreyas Iyer IND vs ENG 3rd T20)

श्रेयस अय्यरने टी-20 संघाचे कर्णधारपद सांभाळल्यापासून भारताला अजून एकही विजय मिळवता आलेला नाही. आधी आयर्लंडने भारताला 2-0 असे पराभूत केले, आणि आता इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांपैकी दोन सामने भारताने गमावले आहेत. तिसऱ्या टी-20 सामन्यातील खराब कामगिरीवर बोलताना श्रेयस म्हणाला की, "हा अत्यंत सुमार दर्जाचा खेळ होता. या कामगिरीचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे यापेक्षा दुसरा कोणताही चांगला शब्द नाही. इतक्या मोठ्या फरकाने पराभूत होणे अजिबात स्वीकारार्ह नाही."

भारताने नाणेफेक जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु इंग्लंडला 7 बाद 201 धावांपर्यंत पोहोचू दिले. इंग्लंडकडून फिल सॉल्टने 70 धावांची तुफानी खेळी केली, तर खालच्या फळीत सॅम करनने नाबाद 41 धावा ठोकल्या. यावर श्रेयस म्हणाला की, इंग्लंडला 200 धावांपर्यंत पोहोचू द्यायला नको होते, कारण ही खेळपट्टी एवढ्या धावांची नव्हती.

भारतीय फलंदाजांची सुमार कामगिरी

202 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी अत्यंत बेजबाबदारपणे विकेट्स गमावल्या. खेळपट्टीवर टिकून राहण्याऐवजी भारतीय फलंदाज चुकीचे आणि हवेत शॉट्स खेळण्याच्या नादात बाद झाले. संपूर्ण संघातून केवळ 4 फलंदाजांनाच दोन अंकी धावसंख्या गाठता आली. वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन, स्वतः कर्णधार श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल हे सर्वच खेळाडू मोठे शॉट्स मारण्याच्या नादात बाद झाले. यामुळे भारताने पॉवरप्लेमध्येच आपले 5 महत्त्वाचे फलंदाज गमावले. गेल्या 5 सामन्यांपासून भारतीय फलंदाजीचा क्रम अशाच प्रकारे पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळताना दिसत आहे.

श्रेयस अय्यरचा खेळाडूंना कडक इशारा

संघाच्या सततच्या खराब कामगिरीवर बोट ठेवत श्रेयस अय्यरने खेळाडूंना थेट इशारा दिला आहे. तो म्हणाला की, "आम्ही खूपच खराब क्रिकेट खेळलो आहोत. आता खेळाडूंनी स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपण मैदानावर कशा प्रकारे प्रभाव पाडू शकतो आणि संघाला विजयाच्या मार्गावर कसे आणू शकतो, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.  त्यामुळे निश्चितपणे आता प्रत्येक खेळाडूला स्वतःहून विचार करावा लागेल आणि आपण संघाला मॅच कशी जिंकवून देऊ शकतो, याची वैयक्तिक जबाबदारी घ्यावी लागेल."

हे ही वाचा -

India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL : सिराज, कृष्णा, गुरनूर ब्रार, आकिब नबी, चारपैकी कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना प्लेईंग XI मध्ये संधी? अजिंक्य रहाणेचा महत्त्वाचा सल्ला
श्रीलंकेविरोधातील पहिल्या कसोटीत कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना संधी? अजिंक्य रहाणेनं दोघांची नाव सांगितली
Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
Advertisement

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget