एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

कोरोनाविरोधी लढाईत निधी जमवण्यासाठी भारत-पाक मालिका खेळवा : शोएब अख्तर

कोरोनाविरोधी लढाईत निधी जमवण्यासाठी भारत-पाकिस्तान मालिका खेळवा, असा प्रस्ताव शोएब अख्तरने ठेवला आहे. तसंच भारताने दहा हजार व्हेंटिलेटर द्यावे, अशी विनंतीही त्याने केली.

मुंबई : कोरोना व्हायरसविरोधातील लढाईसाठी निधी जमवण्याच्या उद्देशाने भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मालिका खेळवण्याचा प्रस्ताव पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने ठेवला आहे. दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका खेळवण्यात यावी, असं शोएब अख्तरने म्हटलं आहे.

पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेने 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये एकही क्रिकेट मालिका झालेली नाही. आयसीसी टुर्नामेंट आणि आशिया कपमध्येच दोन्ही देशांचा सामना झाला आहे.

शोएब अख्तर म्हणाला की, "संकटाच्या काळात दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेचा प्रस्ताव ठेवतो. या मालिकेचा निकाल काहीही आला तरी पहिल्यांदाच दोन्ही देशांपैकी कोणत्याही क्रिकेटप्रेमींना दु:ख होणार नाही. विराट कोहलीने शतक ठोकलं तर आम्ही खुश होऊ. बाबर आजमने शतक केलं तर तुम्ही आनंदी व्हाल. सामन्याचा निकाल काहीही आला तरी दोन्ही संघ विजयी होतील. यामुळे दोन्ही देशांचे राजकीय संबंधही सुधारतील."

या संकटाच्या काळात दोन्ही देशांनी एकमेकांची मदत करायला हवी. भारताने जर आम्हाला दहा हजार व्हेंटिलेटर दिले तर पाकिस्तान ही गोष्ट कायम लक्षात ठेवेल. आम्ही केवळ सामन्यांचा प्रस्ताव ठेवू शकतो. निर्णय अधिकाऱ्यांना घ्यायचा आहे," असंही शोएब अख्तर म्हणाला.

याआधी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या ट्रस्टला मदतीचं आवाहन करणारे भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंह आणि हरभजन सिंह यांच्यावर जोरदार टीका झाली होती. याबाबत शोएब अख्तर म्हणाला की, "हे अमानवी आहे. सध्याच्या परिस्थितीत देश किंवा धर्माची नाही तर मानवतेची चर्चा व्हायला हवी."

भारताने 2008 पासून पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. तर पाकिस्तान एकदिवसीय आणि ट्वेण्टी-20 मालिकेसाठी 2012 मध्ये अखेरचा भारत दौरा केला होता. या दोन्ही देशांनी मागील 8 वर्षांपासून एकमेकांसोबत कोणतीही बायलॅटरल मालिका खेळलेली नाही.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या चार हजारांच्या पार केली आहे. आतापर्यंत 58 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र पंतप्रधान इम्रान खान यांनी अजूनही लॉकडाऊन लावलेला नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
Water reduction in Mumbai: मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
Latur Crime News: अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  1 डिसेंबर 2024 : ABP MajhaAjit Pawar On CM : भाजपचा मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री असतील - अजित पवारTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :1 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 1 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
Water reduction in Mumbai: मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
Latur Crime News: अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
Embed widget