Shaheen Afridi: अफगाणिस्तानचा चाहता अन् शाहीन अफ्रिदीचा वाद; तो एवढ्यावर थांबला नाही, तर...,Video
Pak vs IRE Shaheen Afridi and rude fan: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीचा अफगाणिस्तानच्या चाहत्याशी वाद झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Pak vs IRE Shaheen Afridi and rude fan: पाकिस्तान क्रिकेट संघाने रविवारी आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात शानदार विजय नोंदवला. आयर्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानला मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. पण, रविवारी झालेला दुसरा सामना जिंकून शेजाऱ्यांनी 1-1 अशी मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे तिसरा सामना निर्णायक असणार आहे. मात्र या विजयाच्या आनंदादरम्यानच एका अप्रिय घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीचा अफगाणिस्तानच्या चाहत्याशी वाद झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काय आहे?
सामन्यापूर्वी शाहीन मैदानाच्या दिशेने जात असताना एका अफगाण चाहत्याने त्याला शिवीगाळ केली. 24 वर्षीय शाहीनने थांबून त्या व्यक्तीला उत्तर दिले आणि त्यानंतर टीमच्या सुरक्षा प्रमुखांना याची माहिती दिली. पण हा वाद इथेच संपला नाही. वास्तविक, या व्यक्तीने सामन्यादरम्यानही शाहीनसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. अखेर पाकिस्तान संघाचे प्रशिक्षण किट घातलेल्या सुरक्षा अधिकाऱ्याने त्या व्यक्तीला बाहेर काढले.
Breaking News
— Imran Yousafzai (@DailyNewsmart) May 13, 2024
Shaheen Afridi's bitter words to the Afghan fans while going to the ground from the dressing room.
Shaheen Afridi informed the security head about the matter.
After the incident, the Pakistani security head kicked the suspect out of the ground. pic.twitter.com/c7k6TsoeVu
Afghan fans confronted Pakistani cricket icon Shaheen Afridi, resulting in a verbal exchange.
— Nibraz Ramzan (@nibraz88cricket) May 13, 2024
Security personnel were swiftly alerted, leading to the removal of a suspicious individual from the premises. #IREvPAK pic.twitter.com/nO8oRtJxOc
आफ्रिदीची चमकदार कामगिरी
सदर घटनेनंतरही शाहीन आफ्रिदीने सामन्यात चमकदार कामगिरी केली. या काळात त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एक मोठा टप्पा गाठला. आफ्रिदीने या सामन्यात 300 आंतरराष्ट्रीय विकेट पूर्ण केल्या. पाकिस्तानसाठी ही कामगिरी करणारा तो 12वा गोलंदाज ठरला आहे. चौथ्या षटकात आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगला अवघ्या 11 धावांवर बाद करत आफ्रिदीने ही कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात एकूण 3 बळी घेतले, मात्र असे असतानाही प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंड संघाला 7 बाद 193 धावा करण्यात यश आले.
मालिकेत 1-1 अशी बरोबरी-
प्रत्युत्तरात मोहम्मद रिझवान आणि फखर जमान यांच्या शानदार भागीदारीमुळे पाकिस्तानने 16.5 षटकांत 7 गडी बाकी असताना लक्ष्य गाठले. या विजयासह पाकिस्तानने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना 14 मे रोजी क्लोनटार्फ क्रिकेट क्लब मैदानावर खेळवला जाईल. अखेरचा सामना जिंकून पाकिस्तान या मालिकेवर काबीज करण्यात यशस्वी होणार की आयर्लंड टी-20 विश्वचषकापूर्वी ही मालिका जिंकण्यात यशस्वी ठरणार हे पाहणे विशेष ठरणार आहे.
संबंधित बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

