एक्स्प्लोर

Sai Sudharsan Debut : 'सुदर्शन'चा सूर्योदय! IPL 2025 मध्ये ऑरेंज कॅप जिंकला, वनडे-टी20 गाजवले... आता कसोटीतही साई सुदर्शनचे पदार्पण

इंग्लंडविरुद्ध शुक्रवार (20 जून) पासून लीड्स येथे सुरू होणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात साई सुदर्शनला भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली.

Sai Sudharsan Debut Eng vs Ind 1st Test News : इंग्लंडविरुद्ध शुक्रवार (20 जून) पासून लीड्स येथे सुरू होणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात साई सुदर्शनला भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. तो भारताकडून कसोटी खेळणारा 317 वा खेळाडू आहे. तो तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसेल. साईंपूर्वी, दिग्गज राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारा सारखे फलंदाज या स्थानावर खेळले आहेत. 

साई सुदर्शनने देशांतर्गत क्रिकेटपासून आयपीएलपर्यंत चमकदार कामगिरी केली, त्यानंतर त्याला कसोटी कॅप देण्याचा निर्णय घेण्यात आला. साई सुदर्शन तामिळनाडूकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो.

साई सुदर्शनची कारकीर्द -

साई सुदर्शनने 17 डिसेंबर 2023 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात भारताकडून पदार्पण केले, जिथे त्याने 43 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या. त्याने टीम इंडियासाठी 3 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तसेच, त्याने 2023 च्या आशियाई खेळांमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले. 

2023 मध्ये, साई सुदर्शनने काउंटी क्रिकेट क्लबकडून काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण केले. त्याने त्याच्या पहिल्या हंगामात शतक झळकावले आणि सरेला चॅम्पियनशिप जिंकण्यास मदत केली. साई सुदर्शन तामिळनाडूकडून टी-20, लिस्ट ए आणि प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. 2022-23 मध्ये त्याने रणजी ट्रॉफी हंगामात पदार्पण केले ज्यामध्ये त्याने दोन शतके झळकावली. साई सुदर्शनने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 7 शतके आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत.

त्याच वेळी, 2025 च्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करून सुदर्शन ऑरेंज कॅप विजेता ठरला. त्याने 1 शतक आणि 6 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 759 धावा केल्या. त्याच्या जबरदस्त फॉर्ममुळे त्याला कसोटी संघात संधी देण्यात आली.

अभिमन्यू ईश्वरनला का वगळण्यात आले?

आता प्रश्न असा निर्माण होतो की, 27 शतके झळकावणारा अनुभवी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू अभिमन्यू ईश्वरनला का वगळण्यात आले? यामागे दोन महत्त्वाची कारणे आहेत. साई सुदर्शनचा अलीकडील फॉर्म आणि त्याचे तंत्र. सुदर्शन चेंडू उशिरा खेळण्यासाठी ओळखला जातो, जो इंग्लंडच्या वेगवान आणि स्विंग खेळपट्ट्यांवर फलंदाजीसाठी फायदेशीर आहे. आता साई सुदर्शन लीड्सच्या मैदानावर त्याच्या पदार्पणाचे यशात किती रूपांतर करू शकतो हे पाहणे मनोरंजक ठरेल.

हे ही वाचा -

Ind vs Eng 1st Test : लीड्स टेस्टवर पावसाचं सावट, भारत-इंग्लंड सामन्यावर पाणी फेरणार? हवामान विभागाकडून मोठी अपडेट

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gauri Palave Death : लेकींच्या गळ्यात फास, किती सोसायचा त्रास Special Report
KDMC Mahayuti : 'लक्षात ठेवा कमळ', केडीएमसीत स्वबळ? डोंबिवलीमध्ये नेमकं कुणाचं 'कल्याण'?
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरावर फडकणार धर्मध्वजा! थेट अयोध्येतून ज्ञानदा कदम यांचा Special Report
Gen Z In Election : 'जेन झी'ची भाषा, राजकारणाची दिशा; फडणवीसांचा हुकार, GEN Z ला संधी Special Report
Dharmendra Demise : रोमॅन्टिक हीरो ते बॉलिवूडचा सुपरस्टार..धर्मेंद्र! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
IND vs SA  : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
Team India : वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गंभीरवर भडकले ; भारतावर दुसऱ्या कसोटीत पराभवाचं संकट
वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गौतम गंभीरवर भडकले
Embed widget