एक्स्प्लोर

Ind vs Eng 1st Test : लीड्स टेस्टवर पावसाचं सावट, भारत-इंग्लंड सामन्यावर पाणी फेरणार? हवामान विभागाकडून मोठी अपडेट

India vs England Weather Forecast Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना लीड्समधील हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे.

IND vs ENG 1st Test Weather Forecast : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना लीड्समधील हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. सर्व क्रिकेट चाहते या कसोटी मालिकेची बऱ्याच दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. दोन्ही संघांचे खेळाडू पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी करू इच्छितात. पण, पाऊस या सामन्यात व्यत्यय आणू शकतो. खेळाच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांना कोणतीही अडचण येणार नाही, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पाऊस खलनायक ठरू शकतो.  

लीड्स टेस्टवर पावसाचं सावट

अ‍ॅक्यूवेदरच्या मते, खेळाच्या पहिल्या आणि पाचव्या दिवशी हवामान स्वच्छ असेल, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पाऊस पडू शकतो. खेळाच्या चौथ्या दिवशी संध्याकाळी हलक्या पावसाची शक्यता देखील आहे. खेळाच्या पहिल्या दिवशी तापमान 11 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. सामन्यादरम्यान बहुतेक वेळा आकाश ढगाळ राहील तर वाऱ्याचा वेग ताशी 16 किलोमीटर असेल.

हेडिंग्ले येथे टीम इंडियाची आकडेवारी

भारतीय संघाने आतापर्यंत हेडिंग्ले येथे एकूण 7 कसोटी सामने खेळले आहेत, यामध्ये टीम इंडियाने 2 सामने जिंकले आहेत तर 4 सामने गमावले आहेत आणि एक सामना दोन्ही संघांमध्ये कोणताही निकाल न लावता संपला. या मैदानावर टीम इंडियाने खेळलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात त्यांना एक डाव आणि 76 धावांनी पराभव पत्करावा लागला. हेडिंग्ले येथे टीम इंडियाची आकडेवारी इतकी चांगली नसली तरी, शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला पहिली कसोटी जिंकायला नक्कीच आवडेल.

लीड्सच्या खेळपट्टीबद्दल जाणून घ्या...

हेडिंग्ले क्रिकेट मैदानाची खेळपट्टी गोलंदाजांना अधिक मदत करते. येथे चेंडू स्विंग आणि बाउन्स दोन्ही होतो. जर वारा असेल तर फलंदाजांसाठी डोकेदुखी असेल. एवढेच नाही तर खेळाच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी फिरकीपटूंची भूमिकाही महत्त्वाची ठरेल. दोन्ही संघांच्या खेळाडूंना असे वाटते की गोलंदाजांना जास्त मदत मिळू नये आणि ते चांगली फलंदाजी करू शकतील.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ -

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, ध्रुव जुरेल.

पहिल्या कसोटी भारतविरुद्ध इंग्लंड संघाची प्लेइंग इलेव्हन -

जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग आणि शोएब बशीर.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी ओढले राज ठाकरेंच्या नातवाचे गाल, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी ओढले राज ठाकरेंच्या नातवाचे गाल, नंतर फोटोही काढला
Vileparle bomb bag: विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशय, पोलिसांनी परिसर खाली केला
विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशयाने खळबळ, पोलिसांनी परिसर खाली केला
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी ओढले राज ठाकरेंच्या नातवाचे गाल, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी ओढले राज ठाकरेंच्या नातवाचे गाल, नंतर फोटोही काढला
Vileparle bomb bag: विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशय, पोलिसांनी परिसर खाली केला
विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशयाने खळबळ, पोलिसांनी परिसर खाली केला
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, कारची समोरासमोर धडक; जागेवरच 3 ठार 2 जखमी
परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, कारची समोरासमोर धडक; जागेवरच 3 ठार 2 जखमी
एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, अपर जिल्हाधिकाऱ्यांचा नेतेमंडळींना दणका
एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, अपर जिल्हाधिकाऱ्यांचा नेतेमंडळींना दणका
Baba Adhav health: बाबा आढावांची प्रकृती बिघडली, शरद पवार रुग्णालयात भेटीला पोहोचले
Baba Adhav health: बाबा आढावांची प्रकृती बिघडली, शरद पवार रुग्णालयात भेटीला पोहोचले
Pune Accident News: लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारे फोटो समोर
Pune Accident News: लोणावळ्यातील लायन्स पॉइंटजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, अंगावर काटा आणणारे फोटो समोर
Embed widget