Sachin Tendulkar: घराबाहेरील काम थांबवशील का? संतापलेल्या शेजाऱ्याची सचिन तेंडुलकरविरोधात सोशल मीडियावर तक्रार
Sachin Tendulkar: जगभरात सचिन तेंडुलकरचे लाखो चाहते आहेत. मात्र सचिन तेंडुलकर सध्या वेगळ्याचं कारणामुळे चर्चेत आला आहे.
Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) निवृत्तीनंतरही लोकांच्या मनात घर करुन आहे. क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन आणि त्याचा खेळ कोणी विसरु शकत नाही. जगभरात सचिन तेंडुलकरचे लाखो चाहते आहेत. मात्र सचिन तेंडुलकर सध्या वेगळ्याचं कारणामुळे चर्चेत आला आहे.
सचिन तेंडुलकर याच्या वांद्रे येथील घराबाहेर रविवारी रात्री नऊच्या दरम्यान काँक्रीट मिक्सरच्या आवाजामुळे त्रस्त झालेल्या शेजाऱ्याने सचिनला ट्वीट करून तुझ्या घराबाहेर चाललेले काम कृपया थांबवशील का?, अशी विनंती केली. या ट्वीटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. सचिनने या ट्वीटवर अजून कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु या ट्वीटवर नेटकऱ्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
दुसऱ्या ट्वीटमध्ये काय ?
तक्रार करणाऱ्या दिलीप यांनी दुसऱ्या दिवशी ट्विट करत मला सचिन तेंडुलकर यांच्या ऑफिसमधून फोन कॉल आला होता. त्यांनी मला त्यांच्या अडचणी आणि आवाज कमी करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. माझं बोलणं त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं, असं त्यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली.
नेमकं प्रकरण काय?
भारतीय क्रिकेट सचिन तेंडुलकरला क्रिकेट जगभरात खूप आदर आहे आणि जगभरात त्याचे लाखो चाहते आहेत. पण आता सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्याला पाहून असं वाटतंय की सचिनचा एक शेजारी त्याच्यावर अजिबात खूश नाही. दिलीप डिसूझा नावाच्या एका व्यक्तीने सचिन तेंडुलकरला टॅग केले असून सचिनच्या वांद्रे येथील घराबाहेर सिमेंट मिक्सरच्या आवाजामुळे त्रास होत असल्याचे ट्विट केले आहे. दिलीप नावाच्या व्यक्तीने सचिनला सोशल मीडिया पोस्टद्वारे आवाहन केले आहे की बांधकामाशी संबंधित कामे वाजवी वेळेत करावीत. हे ट्विट इतके व्हायरल होत आहे की, जवळपास 5.5 लाख लोकांनी ते पाहिले आहे.
Dear @sachin_rt, it's nearly 9pm and the cement mixer that's been outside your Bandra home all day making a loud noise is still there, still making a loud noise.
— Dilip D'Souza (@DeathEndsFun) May 5, 2024
Please could you ask the people working on your home to stick to reasonable hours? Thank you so much.
वेगवेगळ्या प्रतिक्रिया-
डिसूझा यांच्या या पोस्टमुळे लोक दोन गटात विभागले गेले आहेत. काही लोक याला डिसोझा यांनी केलेला पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत. या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी डिसूझा यांनी सचिन तेंडुलकरऐवजी बीएमसी किंवा मुंबई पोलिसांना टॅग करायला हवे होते, असे काही लोकांचे म्हणणे आहे. दरम्यान नियमांच्या आधारे पाहिल्यास मुंबईत सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत बांधकाम सुरू ठेवण्यास परवानगी आहे.