Yuzvendra Chahal On Rohit Sharma: 'तो फक्त माझा वापर...' रोहित शर्माच्या नेतृत्वाबाबत युजवेंद्र चहलचं मोठं वक्तव्य
भारताचा स्टार फिरकीपटू युववेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. तसेच टी-20 क्रिकेटमध्ये युजवेंद्र चहल हा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.
भारताचा स्टार फिरकीपटू युववेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. तसेच टी-20 क्रिकेटमध्ये युजवेंद्र चहल हा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. युजवेंद्र चहल 2021 च्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा भाग नव्हता. मात्र, त्यानंतर त्यानं शानदार पुनरागमन केलं. सध्या तो भारतीय संघाचा महत्वाचा गोलंदाज आहे. येत्या 27 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. आशिया चषकातील भारताच्या संघात युजवेंद्र चहल आहे. तसेच आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेतही युजवेंद्र भारतीय संघाचा महत्त्वाचा खेळाडू असेल, असं मानलं जातंय. यापूर्वी युजवेंद्र चहनं भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाबाबत मोठं वक्तव्य केलंय.
युजवेंद्र चहल काय म्हणाला?
रोहित शर्मानं त्याला त्याच्यानुसार गोलंदाजी करण्याचं स्वातंत्र्य दिलं. भारतीय कर्णधारानं नेहमीच माझा विकेट टेकर म्हणून वापर केलाय. "रोहित शर्मानं मला खूप स्वातंत्र्य दिलं, ज्याची प्रत्येक गोलंदाजाला कर्णधाराकडून अपेक्षा करतो. रोहित शर्मा मला नेहमी विचारायचा की मला गोलंदाज म्हणून काय करायचं आहे. तसेच, तो नेहमी मला विचारायचा की मी वेगवेगळ्या परिस्थितीत गोलंदाजी करू शकतो का?
युजवेंद्र चहलचं संजू सॅमसनचं कौतूक
युजवेंद्र चहलनं राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनचंही कौतूक केलंय. युझवेंद्र चहल म्हणाला की, "मला स्वत:नुसार गोलंदाजी करण्याचं स्वातंत्र्य मिळालं. 16-20 षटकात तू एक षटक टाकायचं, या षटकात 15 धावा आल्या तरी चालतील, असं संजू सॅमसननं म्हटलं होतं. कर्णधारानं तुमच्यावर दाखवलेल्या विश्वासानं तुम्ही आणखी चांगलं प्रदर्शन करू शकतात, असंही युजवेंद्र चहलनं म्हटलंय.
घटस्फोटाच्या चर्चांवर युजवेंद्र चहलनं सोडलं मौन
युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांनी सोशल मीडियात चांगलाच जोर धरला होता. यावर युजवेंद्र चहलनं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. इंन्टाग्रामच्या स्टोरीत त्यानं सोशल मीडियातल्या बातम्यांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं. “तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे की आमच्या नात्यातील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. हे सगळं थांबवा", असं युजवेंद्र चहलनं म्हटलंय.
हे देखील वाचा-