एक्स्प्लोर

Rohit Sharma Press Conference : रोहित शर्मा म्हणतो, विराट कोहलीने कर्णधारपद सोडलं असलं तरी...

Rohit Sharma Press Conference, Ind Vs Wi : रविवारी रोहित शर्मा आपल्या कर्णधारपदाची सुरुवात करत आहे. त्यापूर्वी रोहित शर्माने पत्रकार परिषद घेत संवाद साधला.

Rohit Sharma Press Conference, Ind Vs Wi : रविवारी रोहित शर्मा आपल्या कर्णधारपदाची सुरुवात करत आहे. त्यापूर्वी रोहित शर्माने पत्रकार परिषद घेत संवाद साधला. यावेळी रोहित शर्माने प्रत्येक प्रश्नाची आपल्या पद्धतीने उत्तरे दिली. पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित शर्माची ही पहिलीच एकदिवसीय मालिका आहे. त्याआधी बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, 'खूप मोठ्या कालावधीपर्यंत विराट कोहलीने ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे, पण सध्या काही गोष्टी बदलल्या आहेत. '

भारताच्या मर्यादीत षटकांच्या सामने खेळण्याच्या पद्धत्तीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावर रोहित शर्माने आपलं मत व्यक्त केलं. रोहित शर्मा म्हणाला की, 'संघात जास्त काही बदलण्याची गरज नाही. फक्त परिस्थितीनुसार काही बदल करावे लागलीत. गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाने चांगले क्रिकेट खेळले आहे. एक मालिका हरल्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाही. '  पुढे बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, आपली एकदिवसीय सामन्यातील विजयाची सरासरी चांगली आहे. जर बदल करण्याची गरज वाटली तर नक्कीच करेल. पण अचानक आपण दुसऱ्या संघासारखे खेळायला सुरु करु शकत नाही. आपली खेळण्याची पद्धत वेगळी आहे. 
 
विराट कोहली आता टीम इंडियामध्ये माजी कर्णधार आणि एक फलंदाज म्हणून खेळणार आहे. विराट कोहली भारतीय संघाचा महत्वाचा सदस्य आहे. रोहित शर्मा म्हणाला की, ' विराट कोहलीने जिथे सोडले आहे, तेथूनच आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे. प्रत्येकाला आपला रोल माहित आहे. जास्त बदल करण्याची गरज नाही. फक्त परिस्थितीनुसार आपल्याला खेळावे लागेल. मला संघात मोठा बदल करण्याची गरज नाही.  विराट कोहलीने कर्णधारपद सोडलं असलं तरी त्याचंही संघात विशेष महत्त्व असणार आहे.'

ईशान किशन सलामीला - 
पत्रकार परिषदेत रोहित शर्माने ईशान किशन (Ishan Kishan) सलामीला खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबई इंडियन्ससाठी रोहित आणि ईशान यांनी सलामीची भूमिका पार पाडली आहे. आता भारतीय संघासाठी रोहित-ईशान सलामीची भूमिका पार पाडणार आहे. सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्मा म्हणाला की,  'ईशान किशन एकमात्र पर्याय आहे. तो पहिल्या सामन्यात सलामीला येईल. मयंक अग्रवालचा विलगीकरणाचा कालावधी अद्याप पूर्ण झाला नाही. नियम सर्वात आधी येतात. जे खेळाडू प्रवास करुन आलेत, त्यांना नियमांनुसार विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करावा लागेल. जर दुखापत नसेल तर ईशान किशन रविवारी होणाऱ्या सामन्यात सलामीला येईल.'

टीम इंडियासाठी कुलच्या पुन्हा एकत्र खेळणार? - 
यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव म्हणजेच कुलच्या ही जोडी पुन्हा खेळताना दिसेल का? असा प्रश्न कर्णधार रोहित शर्माला विचारण्यात आला. यावर रोहित शर्माने ही जोडी पुन्हा एकत्र खेळताना दिसेल असे संकेत दिले आहेत. रोहित शर्माने कुलच्याचं कौतुकही केलं.  पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात अनेक बदल दिसण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यापूर्वी बोलताना रोहित शर्माने कुलच्या जोडी खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत. रोहित शर्मा म्हणाला की, कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांनी एकत्र गोलंदाजी केल्यास निकाल चांगला लागेल. हे दोन्ही खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत आहे. दोघे एक्तत्र असतील तर नक्कीच प्रभाव दिसून येतो. 

वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान 

वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा टी20 संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवि बिश्नोई, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वरकुमार, आवेश खान, हर्षल पटेल.  

कोरोनाचा धोका लक्षात घेऊन बीसीसीआयने तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि तीन टी-20 सामने दोनच मैदानांवर घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिन्ही टी-20 सामने कोलकात्यात खेळवले जातील.  

वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक 
एकदिवसीय मालिका -
6 फ्रेबुवारी 2022 - अहमदाबाद
9 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
12 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद

टी-20 मालिका
15 फ्रेब्रुवारी 2022 - कोलकाता
18 फेब्रुवारी 2022 - कोलकाता
20 फेब्रुवारी 2022 - कोलकाता

महत्त्वाच्या बातम्या

Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
Ind vs Sl 1st Test : पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
WTC Points Table : श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!
श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!
IND vs SL 1st Test : लंकेत टीम इंडियाचे शक्तीप्रदर्शन! पहिल्या कसोटीत घरात घुसून 165 धावांनी श्रीलंकेचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी
लंकेत टीम इंडियाचे शक्तीप्रदर्शन! पहिल्या कसोटीत घरात घुसून 165 धावांनी श्रीलंकेचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget