Hardik Pandya New Look: आशिया चषकापूर्वी हार्दिक पांड्याचा नवा लूक समोर
Hardik Pandya New Look: सध्या भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे.
Hardik Pandya New Look: सध्या भारतीय संघ झिम्बाब्वे (India Tour of Zimbabwe) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. 18- 22 ऑगस्टदरम्यान, भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील एकदिवसीय मालिका रंगाणार आहे. त्यानंतर 27 ऑगस्टपासून आशिया चषकाला (Asia Cup 2022) सुरुवात होणार आहे. या चषकापूर्वी भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) नवा लूक समोर आलाय.
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या नेहमीच त्याच्या लूक आणि हेअरस्टाइलमुळं चर्चेत असतो. त्याला अनेकवेळा नवीन हेअरस्टाईल आणि नव्या लूकमध्ये पाहायला मिळालंय. आशिया चषक 2022 सुरू होण्यापूर्वी हार्दिक पांड्यानं नवी हेअरस्टाईल केलीय. त्यानंतर मंगळवारी (16 ऑगस्ट) त्यानं लगेचच त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट केले. हार्दिकनं त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये कात्री आणि स्टार इमोजी टाकलंय.
हार्दिक पांड्याची पोस्ट-
झिम्बाब्वे दौऱ्यात हार्दिक पांड्याला विश्रांती
झिम्बाब्वे विरुद्ध एकदिवसीय मालिकेत हार्दिक पांड्याची भारतीय संघात निवड झाली नाही. या मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली, ज्यात हार्दिक पांड्याचाही समावेश आहे. आता हार्दिक पांड्या थेट आशिया चषकात खेळतान दिसणार आहे.
हार्दिक पांड्या जबरदस्त फॉर्ममध्ये
हार्दिक पांड्या सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. आयपीएल 2022 पासून हार्दिक पांड्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मागील काही सामन्यात हार्दिक पांड्यानं फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये दमदार प्रदर्शन करून दाखवलंय. हार्दिकचा फॉर्म ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकात भारतासाठी फायद्याचा ठरण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्याने ऑगस्ट 2022 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियासाठी शेवटचा टी-२० सामना खेळला होता. तर शेवटचा एकदिवसीय सामना जुलै 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला गेला होता. आशिया चषकामध्ये पांड्या दमदार कामगिरी करू शकतो. त्यानं 67 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 50 विकेट घेतल्या आहेत. तर, 63 एकदिवसीय सामन्यात 63 विकेट्स घेतल्या आहेत.
हे देखील वाचा-