Rohit Sharma ODI Retirement : ज्यादिवशी मैदानावर... कसोटीनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून रिटायर होण्याची चर्चा, रोहित शर्माचं महत्त्वाचं स्पष्टीकरण
Rohit Sharma News : 'हिटमॅन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या या स्फोटक फलंदाजाने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

Rohit Sharma ODI Retirement : भारताचा महान सलामीवीर रोहित शर्माने नुकताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला. 'हिटमॅन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या या स्फोटक फलंदाजाने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता रोहित शर्मा फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल. सततच्या खराब फॉर्ममुळे टीकेचा सामना करणाऱ्या रोहितने अचानक कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली. इंग्लंड दौऱ्यावर हिटमॅनला कर्णधारपद दिले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश निवडकर्त्यांनी रोहितला दिला होता, असे मानले जात होते. रोहितने निवृत्तीनंतर सांगितले होते की, तो एकदिवसीय स्वरूपात खेळत राहील. दरम्यान, रोहितने आता 50 षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबाबत एक मोठी अपडेट दिली आहे.
रोहित वनडेमधून कधी निवृत्त होणार?
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विमल कुमार यांच्याशी बोलताना रोहित शर्माने त्याच्या एकदिवसीय निवृत्तीबाबत एक मोठी अपडेट दिली. तो म्हणाला, "मी माझ्या पद्धतीने खेळायचो. मी माझा वेळ घ्यायचो. आधी मी पहिल्या 10 षटकांत 30 चेंडू खेळायचो आणि फक्त 10 धावा करायचो, पण आता जर मी 20 चेंडू खेळतो तर मी 30-35 किंवा 40 धावा का करू शकत नाही? त्याच वेळी, काही सामन्यांमध्ये जेव्हा माझी बॅट चालत असते आणि चेंडू बॅटवर चांगला येत असेल, तेव्हा मी पहिल्या 10 षटकांत 80 धावाही करतो, जे अजिबात चुकीचे नाही. ही माझी विचार करण्याची पद्धत आहे."
रोहित पुढे म्हणाला, "पण, आता मला वेगळ्या पद्धतीने क्रिकेट खेळायचे आहे. मी काहीही हलके घेत नाही. असे गृहीत धरू नका की मी 20 ते 30 धावा करून फलंदाजी करत राहिलो तर गोष्टी तशाच चालू राहतील. ज्या दिवशी मला वाटेल की, मी मैदानावर जे करायचे आहे ते करू शकत नाही, तेव्हा मी खेळायचे थांबवेन. हे निश्चित आहे.
कर्णधारपदाच्या यादीत कोण आहे आघाडीवर?
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराहने चांगली गोलंदाजी केली. परिणामी, शेवटची कसोटी येईपर्यंत बुमराहला पाठीच्या दुखापतीचा त्रास झाला, ज्यामुळे त्याला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी गमवावी लागली. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर आता शुभमन गिल आणि ऋषभ पंत हे या पदासाठी आघाडीवर असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
भारताचा इंग्लंड दौरा
पहिली कसोटी : 20 जून - 24 जून, हेडिंग्ले
दुसरी कसोटी : 2 जुलै-6 जुलै, एजबॅस्टन
तिसरी कसोटी : 10 जुलै-14 जुलै, लॉर्ड्स
चौथी कसोटी : 23 जुलै - 27 जुलै, एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड
पाचवी कसोटी : 31 जुलै - 4 ऑगस्ट, ओव्हल
हे ही वाचा -





















