एक्स्प्लोर

Rohit Sharma : रोहित शर्मा देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत कमबॅक करणार, जाणून घ्या कोणत्या स्पर्धेत खेळणार?

Rohit Sharma Duleep Trophy 2024: रोहित शर्मा आणि विराट कोहली आणि इतर खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहेत.  

मुंबई:भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा नुकताच संपला आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होण्यास अजून महिनाभराचा कालावधी आहे. या दरम्यान देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांना ( Domestic Cricket) सुरुवात होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज खेळाडू 5 सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या दिलीप ट्रॉफीमध्ये खेळण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) देखील दिलीप ट्रॉफी खेळण्याची शक्यता आहे. 5 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर ही  स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत चार संघ खेळतील. यामध्ये ए.बी.सी.डी अशी नावं या संघांना दिली जाणार आहे.  

रोहित शर्मा किती वर्षानंतर देशांतर्गत क्रिकेट खेळणार?

रोहित शर्मा दिलीप ट्रॉफीत सहभागी झाल्यास तो तब्बल 8 वर्षांनतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळेल. यापूर्वी रोहितनं 2016 मध्ये दिलीप ट्रॉफीत खेळला होता. रोहित शर्मा त्यावेळी इंडिया ब्ल्यू संघाकडून खेळला होता. रोहितनं त्यावेळी पहिल्या डावात 30 तर दुसऱ्या डावात नाबाद 32 धावा केल्या होत्या. इंडिया ब्ल्यूनं तो सामना 355 धावांनी जिंकला होता.  

गौतम गंभीरच्या नेतृत्त्वात खेळलेला रोहित शर्मा

रोहित शर्मा दिलीप ट्रॉफी 2016 मध्ये इंडिया ब्ल्यू संघाकडून गौतम गंभीरच्या नेतृत्त्वात खेळला होता. सध्या रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे तर, गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. गौतम गंभीरनं त्या मॅचमध्ये पहिल्या डावात 94 तर दुसऱ्या डावात 32 धावा केल्या होत्या.  

रोहित शर्माची प्रथमश्रेणी कारकीर्द

रोहित शर्मानं त्याच्या करिअरमध्ये 120 सामने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये खेळले आहेत. यामध्ये त्यानं 9123 धावा केल्या आहेत. या दरम्यान रोहितनं 29 शतकं आणि 37 अर्धशतकं केली आहेत. रोहित शऱ्मा करिअरच्या सुरुवातीला लेग स्पिन गोलंदाजी करायचा. रोहित शर्मानं प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये  24 विकेट घेतल्या आहेत.  

दरम्यान,  रोहित शर्मा प्रमाणं विराट कोहली देखील देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळू शकतं. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर टी 20  क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. सूर्यकुमार यादवनं देखील मुंबईच्या संघाकडून देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं टीम इंडियातील दिग्गज खेळाडू देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत असल्यानं प्रेक्षकांचा देखील या सामन्यांना चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या 

रोहित-विराटने BCCIची अट मान्य केली?;बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपूर्वी देशांतर्गत स्पर्धा खेळणार
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena and NCP MLA Disqualification Case : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आता पुन्हा नव्याने तारखा!
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आता पुन्हा नव्याने तारखा!
Chhatrapati Sambhajiraje : छत्रपती संभाजीराजेंनी सर्व पक्षांना घेरलं! म्हणाले, 'कारल्याच्या भाजीसारखं राजकारण कडू...'
छत्रपती संभाजीराजेंनी सर्व पक्षांना घेरलं! म्हणाले, 'कारल्याच्या भाजीसारखं राजकारण कडू...'
PM Modi In AKola : महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
Radhakrishna Vikhe Patil : आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi Akola : अकोल्यात नरेंद्र मोदींच्या निशाण्यावर काँग्रेसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 9 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaToofan Aalaya Paani Foundation तुफान आलंया Water Cup नंतर Farmer Cup, शेतीतील यशोगाथा, जरुर पाहा!Sadabha Khot on Encounter :  2012 मध्ये माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता; सदाभाऊ खोतांचा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena and NCP MLA Disqualification Case : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आता पुन्हा नव्याने तारखा!
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आता पुन्हा नव्याने तारखा!
Chhatrapati Sambhajiraje : छत्रपती संभाजीराजेंनी सर्व पक्षांना घेरलं! म्हणाले, 'कारल्याच्या भाजीसारखं राजकारण कडू...'
छत्रपती संभाजीराजेंनी सर्व पक्षांना घेरलं! म्हणाले, 'कारल्याच्या भाजीसारखं राजकारण कडू...'
PM Modi In AKola : महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
Radhakrishna Vikhe Patil : आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
Jayant Patil on Ajit Pawar : पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
D. K. Shivakumar : महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; पीएम मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
ते ठाकरे असतील तर मी राऊत, संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, आता मनसेने राऊतांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, काँग्रेससोबत...
ते ठाकरे असतील तर मी राऊत, संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, आता मनसेने राऊतांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, काँग्रेससोबत...
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
Embed widget