Rohit Sharma century : रोहित शर्माचं धडाकेबाज शतक, 3 बाद 33 धावांवरुन डाव सावरला
Rohit Sharma century : रोहित शर्माचं हे कसोटीतील 11 वे शतक आहे. याआधीच्या दोन्ही कसोटी सामन्यात रोहितला विशेष अशी कामगिरी करता आली नव्हती. ती कसर रोहित शर्माने या कसोटीत भरुन काढली.
![Rohit Sharma century : रोहित शर्माचं धडाकेबाज शतक, 3 बाद 33 धावांवरुन डाव सावरला Rohit Sharma hit century against England at Rajkot test Indian captain partnership with Ravindra Jadeja ind vs eng latest cricket score Rohit Sharma century : रोहित शर्माचं धडाकेबाज शतक, 3 बाद 33 धावांवरुन डाव सावरला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/15/b6459e0acc34952ed6ff786d394e8e511707990132252291_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IndvsEng राजकोट : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा (India vs England Test) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma century) धडाकेबाज शतक ठोकलं. रोहितने 157 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह शतकाला गवसणी घातली. रोहित शर्माचं हे कसोटीतील 11 वे शतक आहे. याआधीच्या दोन्ही कसोटी सामन्यात रोहितला विशेष अशी कामगिरी करता आली नव्हती. ती कसर रोहित शर्माने या कसोटीत भरुन काढली.
या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची अवस्था 3 बाद 33 अशी होती. या परिस्थितीतून रोहित शर्माने रवींद्र जाडेजाला सोबतीला घेत, भारतीय डावाला आकार दिला. रवींद्र जाडेजाही शतकाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
Captain Rohit Sharma standing tall for India. 🇮🇳pic.twitter.com/pQHmFG8Npa
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 15, 2024
रोहित शर्माने सलामीचा फलंदाज म्हणून इंग्लंडविरुद्ध झळकावलेलं हे तिसरं शतक आहे. भारताकडून यापूर्वी इंग्लंडविरुद्ध सलामीला येऊन केएल राहुल, मुरली विजय, विजय मर्चेंट यांनीही तीन-तीन शतकं झळकावली आहेत. सुनील गावस्कर यांच्या नावे सर्वाधिक चार शतकांचा समावेश आहे.
शतक झळकावून रोहित माघारी
दरम्यान, रोहित शर्मा धडाकेबाज शतक झळकावून माघारी परतला. रोहित शर्माने 196 चेंडूत 131 धावा ठोकल्या. यामध्ये त्याने 14 चौकार आणि 3 षटकार लगावले.
आघाडीची फळी ढेपाळली
दरम्यान, या सामन्यात भारताला यशस्वी जयस्वालच्या रुपाने पहिला धक्का बसला. मागील कसोटीत द्विशतक ठोकणाऱ्या यशस्वी जयस्वालला या सामन्यात फक्त 10 धावाच करता आल्या. मार्क वूडने त्याला बाद करुन भारताला पहिला झटका दिला. जयस्वाल बाद झाला त्यावेळी भारताची अवस्था 1 बाद 22 अशी होती.
यानंतर मग मागच्या सामन्यातील शतकवीर शुभमन गिल मैदानात आला. मात्र त्याला या सामन्याच्या पहिल्या डावात भोपळाही फोडता आला नाही. वूडनेच त्याला शून्यावर बाद केलं. मग फलंदाजीसाठी आलेल्या रजत पाटीदारकडून (Rajat Patidar ) मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण त्यानेही भ्रमनिराश केला. रजत पाटीदारला हार्टलीने अवघ्या 5 धावांवर माघारी धाडून, भारताची अवस्था 3 बाद 33 अशी केली.
जाडेजाच्या साथीने रोहित शर्माने डाव सावरला
टीम इंडिया बिकट अवस्थेत सापडली असताना, रोहित शर्माने रवींद्र जाडेजाच्या साथीने डाव सावरला. जाडेजा पाचव्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरला. जाडेजानेही एक-दोन धावा काढत रोहित शर्माला उत्तम साथ दिली. या जोडीने केलेल्या संयमी खेळीमुळे भारताने 59 षटकात 206 धावांचा टप्पा ओलांडला.
टीम इंडियाची प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)