Rohit Sharma : लॅम्बोर्गिनीमध्ये जात असताना मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये पुरता फसला रोहित शर्मा, चाहत्यांना बघताच ते केलं अन् Video झाला व्हायरल
भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मा याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Rohit Sharma News : भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मा याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये रोहित मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये आपल्या नव्या लॅम्बोर्गिनी Urus SE मध्ये अडकलेला दिसतोय. कारमध्ये रोहितसोबत आणखी एक व्यक्ती होता आणि दोघंही गप्पा मारत बसलेले होते.
अचानक एका फॅनने त्यांचा व्हिडीओ शूट करायला सुरुवात केली. हे पाहून रोहितने फॅनकडे दुर्लक्ष न करता उलट हात वर करून त्याला प्रतिसाद दिला. हा छोटासा क्षण पाहून त्या फॅनचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं होतं. “ट्रॅफिकमध्ये अडकलेले रोहित शर्मा, तरीसुद्धा चाहत्यांला बघताच हात वर केला, ज्यांचा व्हिडीओ आता सोशिल मीडियावर व्हायरल होत आहे.
Rohit Sharma got stuck in Mumbai traffic in his new Lamborghini, but he still didn’t forget to wave to his fans while heading home after finishing training.❤️
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) August 22, 2025
The man with golden heart @ImRo45 🐐 pic.twitter.com/ioJvh93h7b
किती किमतीची आहे रोहितची नवी गाडी?
रोहितने आपली जुनी Urus बदलून खास अपडेटेड लॅम्बोर्गिनी Urus SE खरेदी केली आहे. या SUV ची किंमत तब्बल ₹4.57 कोटी (एक्स-शोरूम) आहे. लाल रंगाची ही कार सध्या चर्चेत आहे. यावर खास नंबर प्लेट 3015 लावण्यात आली आहे, ज्याचा रोहितच्या कुटुंबाशी आणि क्रिकेट कारकिर्दीशी विशेष संबंध आहे. याआधी त्याच्या गाडीवर 264 हा नंबर होता, कारण श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यात रोहितचा सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या विक्रम 264 धावा आहे. ही दमदार SUV 800 HP पॉवर आणि 950 NM टॉर्क निर्माण करते. फक्त 3.4 सेकंदांत 0 ते 100 किमी/तास वेग पकडण्याची क्षमता तिला आहे.
आता कधी दिसेल मैदानात?
रोहित शर्माने यंदा टेस्ट क्रिकेट आणि टी-20 ला अलविदा केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्याने कसोटीला रामराम केला, तर आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यानंतर टी-20 मधूनही निवृत्ती घेतली. आता तो फक्त वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या भारत–ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत रोहितची पुनरागमनाची शक्यता आहे. एवढंच नाही तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या इंडिया-ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया-ए अनौपचारिक वनडे मालिकेत देखील रोहितचा सहभाग असू शकतो, अशी चर्चा आहे.
हे ही वाचा -





















