एक्स्प्लोर

PCB Central Contract : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या वार्षिक कराराने क्रिकेटविश्व हादरले; A ग्रेडमध्ये कोणालाच स्थान नाही, बाबर-रिझवानची तर इज्जत काढली!

आशिया कप 2025 च्या आधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुढील हंगामासाठी केंद्रीय करार जाहीर केला आहे.

PCB Central Contract : आशिया कप 2025 च्या आधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुढील हंगामासाठी केंद्रीय करार जाहीर केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 'अ' श्रेणीत कोणत्याही खेळाडूचे नाव नाही. ज्याच्यावर कालपर्यंत पाकिस्तान अभिमान बाळगत होता, ते बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान आज स्वतःच्या बोर्डाकडूनच इज्जत काढली. आशिया कप 2025 च्या संघात स्थान न मिळाल्याने निराश झालेल्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आणखी एक मोठा धक्का दिला आहे. दोघांनाही 'अ' श्रेणीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवण्यात आला आहे. 

'अ' श्रेणीमध्ये कोणालाच स्थान नाही

मनोरंजक गोष्ट म्हणजे पाकिस्तानच्या केंद्रीय करारात 'अ' श्रेणीत नाव नाही. सध्याच्या कोणत्याही खेळाडूकडे 'अ' श्रेणीत समाविष्ट होण्याइतकी ताकद नाही असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 30 खेळाडूंचा करार केला आहे. पीसीबीने एक अधिकृत निवेदन जारी करून म्हटले आहे की, "हे करार 1 जुलै 2025 ते 30 जून 2026 पर्यंत लागू असतील. या वर्षीच्या यादीत, प्रत्येकी दहा खेळाडूंना बी, सी आणि डी श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. या सायकलमध्ये कोणत्याही खेळाडूची अ श्रेणीसाठी निवड झालेली नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे."

बाबर-रिझवानला मोठा धक्का

पीसीबीच्या केंद्रीय करारात कोणत्या श्रेणीत किती पैसे दिले जातील हे नमूद केलेले नाही. स्टार खेळाडू बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान यांना मागील दोन वर्षांतील सातत्याने झालेल्या खराब कामगिरीची मोठी किंमत चुकवावी लागली आहे. दोघेही आता ब श्रेणीत घसरले आहेत. त्याच वेळी, दरम्यान, आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तान संघाचे नेतृत्व करणार असलेला सलमान अली आगा याला सी वरून प्रमोशन देत ब श्रेणीत स्थान देण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या खेळाडूंची केंद्रीय करार यादी

  • ब श्रेणीतील (10 खेळाडू) : अबरार अहमद, बाबर आझम, फखर जमान, हरिस रौफ, हसन अली, मोहम्मद रिझवान, सैम अयुब, सलमान अली आगा, शादाब खान आणि शाहीन शाह आफ्रिदी.
  • क श्रेणीतील (10 खेळाडू) : अब्दुल्ला शफीक, फहीम अश्रफ, हसन नवाज, मोहम्मद हरिस, मोहम्मद नवाज, नसीम शाह, नोमान अली, साहिबजादा फरहान, साजिद खान आणि सौद शकील.
  • ड श्रेणीतील (10 खेळाडू) : अहमद दानियाल, हुसैन तलत, खुर्रम शहजाद, खुशदिल शाह, मोहम्मद अब्बास, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, सलमान मिर्झा, शान मसूद आणि सुफियान मोकीम.

हे ही वाचा -

Shubman Gill News : आशिया कपच्या निवडीनंतर काही दिवसात शुभमन गिल मोठ्या स्पर्धेतून बाहेर, 'या' खेळाडूच्या गळ्यात आता संघाची धुरा

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
IND vs SL : सिराज, कृष्णा, गुरनूर ब्रार, आकिब नबी, चारपैकी कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना प्लेईंग XI मध्ये संधी? अजिंक्य रहाणेचा महत्त्वाचा सल्ला
श्रीलंकेविरोधातील पहिल्या कसोटीत कोणत्या दोन वेगवान गोलंदाजांना संधी? अजिंक्य रहाणेनं दोघांची नाव सांगितली
Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget