Rohit Sharma : फॉरमॅट बदलला, पण हिटमॅनची कामगिरी नाही! कर्णधार रोहित शर्माने पुन्हा केली तीच चुक; 7 चेंडूत खेळ खल्लास, पाहा Video
कसोटी, रणजीमध्ये अपयशी ठरल्यानंतर आता रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती.

Rohit Sharma IND vs ENG 1st ODI : कसोटी, रणजीमध्ये अपयशी ठरल्यानंतर आता रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. पण, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात फॉरमॅट बदलला, परंतु रोहितची कामगिरी नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधाराचा खेळ फक्त 7 चेंडूत संपला. हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित फक्त 2 धावा करून आऊट झाला. नागपूरमध्येही खराब फॉर्मने रोहितला सोडले नाही.
— Kohlisensual media account (@KS05posting) February 6, 2025
रोहित पुन्हा एकदा ठरला अपयशी
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माकडून सर्वांनाच मोठी खेळी अपेक्षित होती. नागपूरच्या मैदानावर हिटमनचा रेकॉर्ड चांगला होता आणि तो या मैदानाशी चांगला परिचित होता. पण, भारतीय कर्णधाराने पुन्हा एकदा लाखो भारतीय चाहत्यांचे मन मोडले. 7 चेंडूंचा सामना केल्यानंतर रोहित फक्त 2 धावा करून बाद झाला. शाकिब महमूदच्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तो कॅच आऊट झाला. ज्याचा व्हिडिओ आता सोशल माडियावर व्हायरल होत आहे.
Rohit Sharma's last innings:
— TukTuk Academy (@TukTuk_Academy) February 6, 2025
0, 8, 18, 11, 3, 6, 10, 3, 9, 2
And this guy decides who is effective and who's not for Indian team😭🙏 pic.twitter.com/P1ChFJg3bX
16 डावांमध्ये फक्त एक अर्धशतक
रोहित शर्माने गेल्या 16 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये फक्त एकच अर्धशतक झळकावले आहे. एवढेच नाही तर गेल्या 16 डावांमध्ये 11 वेळा हिटमॅनला दुहेरी आकडा ओलांडण्यात अपयश आले आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहितला वाईट कामगिरी करावी लागली होती. पण, त्याच्या आवडत्या एकदिवसीय स्वरूपात तो त्याचा हरवलेला फॉर्म शोधू शकेल असा विश्वास होता. पण तसे झाले नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहितच्या सतत घसरत्या फॉर्ममुळे संघ व्यवस्थापनाचा ताण आणखी वाढला आहे.
Rohit Sharma could have easily scored 100 today & easily won match for India, but he wanted to give opportunity to youngsters (Gill & Iyer) to bat in high pressure run match. So, he got out intentionally.
— ICC Asia Cricket (@ICCAsiaCricket) February 6, 2025
That's selfless Captain for you🫡 😍#RohitSharma pic.twitter.com/xiajGzPytS
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
