एक्स्प्लोर

Rishabh Pant LSG Captain : ऋषभ पंत बनला लखनऊ सुपर जायंट्सचा नवा कर्णधार! संघ मालकाने अनोख्या पद्धतीने कॅप्टनची घोषणा

आयपीएल 2025 चा थरार येत्या 21 मार्चपासून रंगणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व संघ हळूहळू त्यांच्या कर्णधारांची नावे जाहीर करत आहेत.

Rishabh Pant to captain Lucknow Super Giants : आयपीएल 2025 चा थरार येत्या 21 मार्चपासून रंगणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व संघ हळूहळू त्यांच्या कर्णधारांची नावे जाहीर करत आहेत. काही दिवसांपूर्वी पंजाब किंग्ज संघाने श्रेयस अय्यरला आपला कर्णधार बनवले. दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्स संघानेही आपला कर्णधार जाहीर केला आहे. 

ऋषभ पंत लखनऊ सुपर जायंट्स संघाचा नवा कर्णधार असेल. येत्या हंगामात एलएसजी संघाचे नेतृत्व कोण करेल. लखनऊ सुपर जायंट्सने त्याला लिलावात 27 कोटी रुपयांना खरेदी केले. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात महागडी बोली होती. ऋषभ पंतने यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले होते.

लखनऊ सुपर जायंट्स संघाचे मालक संजीव गोयंका यांनी ऋषभ पंतसोबत पत्रकार परिषद घेतली आणि सांगितले की, हा धडाकेबाज यष्टीरक्षक-फलंदाज संघाची जबाबदारी सांभाळेल. या घोषणेसोबतच, संजीव गोयंका यांनी दावा केला की ऋषभ पंत केवळ या संघाचाच नाही तर संपूर्ण आयपीएलचा महान कर्णधार असल्याचे सिद्ध होईल. 2025 च्या आयपीएलमध्ये ऋषभ पंत लखनऊचे नेतृत्व करेल हे निश्चित मानले जात होते.  

ऋषभ पंतला आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे. 2021 मध्ये तो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनला. पण 2024 नंतर त्याचे मार्ग दिल्लीपासून वेगळे झाले. यानंतर तो लखनऊ संघात सामील झाला आणि आता त्याचे ध्येय संघाला चॅम्पियन बनवणे असेल.

लखनऊ सुपर जायंट्स संघ आयपीएल 2022 पासून खेळत आहे. 2022, 2023 आणि 2024 मध्ये, लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व केएल राहुलने केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली संघ 2022 आणि 2023 मध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरला, परंतु 2024 मध्ये त्यांचा संघ तसे करू शकला नाही. मेगा लिलावापूर्वी लखनऊने केएल राहुलला रिटेनही केले नव्हते. केएल राहुल पुढील हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसेल. यावेळी लखनऊ संघ नवीन आशा घेऊन येत आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना त्यांच्या नवीन कर्णधाराकडून खूप अपेक्षा असतील.

लखनऊ सुपर जायंट्स संघ - ऋषभ पंत, निकोलस पूरन, आयुष बदोनी, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसिन खान, डेव्हिड मिलर, एडेन मार्कराम, मिशेल मार्श, शाहबाज अहमद, आकाश सिंग, आवेश खान, अब्दुल समद, आर्यन जुयाल, आकाश दीप, शेमार जोसेफ, प्रिन्स यादव , युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, अर्शीन कुलकर्णी, मॅथ्यू ब्रीट्झके, हिम्मत सिंग, एम. सिद्धार्थ, दिग्वेश सिंग.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल   
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल   
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 02 PM 20 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सAkshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल   
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल   
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
Akshay Shinde Encounter: निवडणुकीत हिरो बनण्यासाठी 'देवाभाऊचा न्याय'; हिरोगिरीच्या स्पर्धेतून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र
निवडणुकीत हिरो बनण्यासाठी 'देवाभाऊचा न्याय'; हिरोगिरीच्या स्पर्धेतून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा; देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा; देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! जळगावात 'सैराट'ची पुनरावृत्ती; लग्नाच्या 5 वर्षांनंतर मुलीच्या घरच्यांनी मुलाला संपवलं
प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! जळगावात 'सैराट'ची पुनरावृत्ती; लग्नाच्या 5 वर्षांनंतर मुलीच्या घरच्यांनी मुलाला संपवलं
Embed widget