Rishabh Pant Record: आशियाबाहेर ऋषभ पंतची ऐतिहासिक कामगिरी; भारतीय विकेटकिपरला दुसऱ्यांदा जमलं नाही, ते त्यानं तिसऱ्यांदा करुन दाखवलं
Rishabh Pant Record: भारताचा स्फोटक विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी फक्त शतक झळकावलं नाही तर, भारतीय संघाचा डाव देखील सावरला.
Rishabh Pant Record: भारताचा स्फोटक विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी फक्त शतक झळकावलं नाही तर, भारतीय संघाचा डाव देखील सावरला. याशतकासह रिषभच्या नव्या विक्रमाची नोंद झालीय. कसोटी क्रिकेटमध्ये आशियाबाहेर सर्वाधिक शतक करणाऱ्या भारतीय विकेटकिपरच्या यादीत रिषभ पंत अव्वल स्थानी पोहचलाय. रिषभनं आशियाबाहेर कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत तीन शतक झळकावले आहेत.
ऋषभ पंतनं आशियाबाहेर शतक करणाऱ्या इतर भारतीय विकेटकिपर फलंदाजांना मागं टाकलंय. पदार्पणाच्या काही वर्षांतच रिषभ पंतनं अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्यानं अनेकदा टीम इंडियाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनंतर त्यानं आता दक्षिण आफ्रिकेतही आपल्या दमदार खेळीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
आशियाबाहेर शतक करणारे भारतीय विकेटकिपर
1) विजय मांजरेकर हे आशियाबाहेर शतक करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक होता. त्यानं 1952 मध्ये किंग्स्टनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 118 धावांची खेळी खेळली होती.
2) अजय रात्रा यांनीही वेस्ट इंडिजमध्येच शतक झळकावले. त्यानं 2002 115 धावा केल्या होत्या.
3) ऋद्धिमान साहानं 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 104 धावा केल्या होत्या.
4) ऋषभ पंतनं 2018 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत 114 धावा केल्या होत्या.
5) ऋषभ पंतनं 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीत 159 धावांची नाबाद खेळी खेळली होती.
6) ऋषभ पंतने 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटीत नाबाद 100 धावा केल्या होत्या.
हे देखील वाचा-
- SA Vs IND: टीम इंडियाच्या नावावर नकोसा विक्रम, कसोटी इतिहासात पहिल्यांदाच सर्व फलंदाज असे झाले बाद
- Australian Open 2022 : नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन खेळणार! संयोजकांकडून मुख्य ड्रॉमध्ये समावेश
- West Indies vs Ireland: आयर्लंडचा वेस्ट इंडिजला दे धक्का; पाच विकेट्सने विजय मिळवत मालिकेत बरोबरी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha