(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Australian Open 2022 : नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन खेळणार! संयोजकांकडून मुख्य ड्रॉमध्ये समावेश
Australian Open 2022 : नोवाक जोकोविच (Novak Djokovic) अखेर ऑस्ट्रेलियन ओपन खेळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. संयोजकांकडून जोकोविचचा मुख्य ड्रॉमध्ये समावेश करण्यात आला आहे.
Djokovic Controversy : सर्बियाचा जागतिक अग्रमानांकित नोवाक जोकोविचचा (Novak Djokovic) विजनवास अखेर संपुष्टात येण्याचे संकेत आहेत. ऑस्ट्रेलियन खुली ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धा सुरू होण्यासाठी एका आठवड्याहून कमी अवधी शिल्लक असतानाही जोकोविचच्या समावेशाबाबत अनिश्चितता कायम होती. मात्र आता वर्षातील पहिल्या ग्रॅण्डस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनचा मुख्य ड्रॉ जाहीर झाला आहे. यात जगातील नंबर वन खेळाडू आणि नऊ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन नोवाक जोकोविचलाही स्थान मिळालं आहे. दरम्यान, व्हिसाप्रकरणी टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलिया सरकारविरोधातील खटला जिंकलाय. व्हिसा रद्द करणे आणि डिटेन्शन चुकीचं असल्याचा निर्वाळा कोर्टाने दिला आहे. त्याला त्याचा पासपोर्ट परत करण्यात आला.
आपल्या कारकीर्दितील दहावं ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज असलेला नोवाक जोकोविच यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळणार की, नाही यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह होतं. परंतु, ऑस्ट्रेलियन ओपनचा मुख्य ड्रॉ जाहीर झाला आणि त्यामध्ये नोवाक जोकोविचलाही स्थान मिळाल्यामुळं नोवाक आता ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
...म्हणून ऑस्ट्रेलियानं नोवाक जोकोविचचा व्हिसा रद्द केला होता
जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू सर्बियाच्या नोवाक जोकोविच याचा व्हिसा ऑस्ट्रेलियानं रद्द केला होता. ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नोवाक जोकोविच मेलबर्न विमानतळावर पोहोचला होता. तत्पूर्वीत्यानंतर जोकोविचला विमानतळावर काही तास थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर देशात प्रवेशासंबंधी आवश्यक कागदपत्रं सादर न केल्यामुळं त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला होता. जोकोविचनं आतापर्यंत कोरोनाची लस घेतलेली नाही.
सर्वश्रेष्ठ टेनिस खेळाडू आणि 9 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियाहून क्रोएशियाला रवाना होण्यापूर्वी सांगितलं होतं की, वैद्यकीय कारणांमुळे त्याला लसीपासून सूट देण्यात आली आहे. यापूर्वी, टेनिस ऑस्ट्रेलिया आणि व्हिक्टोरियन राज्य सरकारनं सांगितलं होतं की, जोकोविचसह आणखी 26 अर्जदारांनी लसीकरणाशिवाय ऑस्ट्रेलियात प्रवेश करण्यासाठी अर्ज केला होता. त्यावेळी त्यानं सांगितलं होतं की, वैद्यकीय कारणांमुळे त्यांनं कोविड-19 ची लस घेतलेली नाही. पण ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) यांनी जोकोविचबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. जर जोकोविच वैद्यकीय कारणं सिद्ध करू शकला नाही, तर त्याला ऑस्ट्रेलियात प्रवेश दिला जाणार नाही, असं पंतप्रधान म्हणाले होते. यावरुन अनेक चर्चा रंगल्या होत्या. अखेर हा वाद कोर्टात पोहोचला आणि निकाल जोकोविचच्या बाजूनं लागला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह