एक्स्प्लोर

LSG vs RCB IPL 2026 : गोलंदाज हट्टावर, कर्णधाराचा मोठा निर्णय! पंतच्या 'त्या' एका मास्टर स्ट्रोकमुळे मध्यरात्री मॅचचा निकालच बदलला; नेमकं काय घडलं?

LSG beat RCB by 9 runs DLS IPL 2026 : इकाना स्टेडियमवर शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने आरसीबीवर नाट्यमय विजय मिळवला.

LSG beat RCB by 9 runs DLS IPL 2026 : इकाना स्टेडियमवर शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने आरसीबीवर नाट्यमय विजय मिळवला. शेवटच्या षटकात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला विजयासाठी 20 धावांची गरज असताना मैदानावर जबरदस्त हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मात्र अशा दबावाच्या क्षणी कर्णधार ऋषभ पंतने घेतलेला एक धाडसी निर्णय लखनऊसाठी ‘गेमचेंजर’ ठरला.

शेवटच्या षटकात पंतचा मास्टरस्ट्रोक

अखेरचे षटक टाकण्यासाठी अनुभवी शाहबाज अहमद आणि युवा फिरकीपटू दिग्वेश सिंग राठी दोघेही सज्ज होते. सुरुवातीला पंत शाहबाजकडे चेंडू सोपवणार होता. पण मिचेल मार्शसोबत चर्चा केल्यानंतर त्याने अचानक निर्णय बदलला आणि दिग्वेश राठीवर विश्वास दाखवला. या निर्णयामुळे शाहबाज अहमद स्पष्टपणे नाराज दिसला. त्याने पंतकडे हट्टाने चेंडू मागितला. परिस्थिती इतकी तापली की, मैदानातच ऋषभ पंतला शाहबाजला सुनवावे लागले. मात्र पंत आपल्या निर्णयावर ठाम राहिला आणि शेवटी चेंडू राठीलाच देण्यात आला.

दिग्वेश राठीने फिरकीत अडकवले आरसीबीला

पंतचा हा डाव अचूक ठरला. दिग्विजय राठीने दबावाच्या क्षणी अप्रतिम गोलंदाजी करत आरसीबीच्या फलंदाजांना पूर्णपणे रोखून धरले. रोमारियो शेफर्ड आणि कृणाल पंड्यासारख्या धडाकेबाज फलंदाजांनाही त्याने एकही षटकार मारू दिला नाही. राठीने अखेरच्या षटकात फक्त 10 धावा दिल्या आणि आरसीबीचा पराभव झाला. अखेरीस लखनऊने हा सामना 9 धावांनी जिंकत प्ले-ऑफच्या आशा जिंवत ठेवल्या.

पंतचा निर्णय ठरला विजयाचा हिरो 

जर ऋषभ पंतने शाहबाजची मागणी मान्य केली असती, तर सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता. पण युवा दिग्वेश राठीवर दाखवलेला विश्वास लखनऊसाठी सुवर्णक्षण ठरला. राठीने आपल्या अचूक गुगली आणि शांत स्वभावाने दबाव झेलत सामना लखनऊच्या बाजूने फिरवला. हा विजय केवळ दोन गुणांचा नव्हता, तर ऋषभ पंतच्या नेतृत्वाची आणि योग्य वेळी घेतलेल्या धाडसी निर्णयाची मोठी परीक्षा होती आणि त्यात तो पूर्णपणे यशस्वी ठरला.

हे ही वाचा -

Virat Kohli Wicket Prince Yadav : चेसमास्टर विराट कोहली शून्यावर बाद, प्रिन्स यादवचा बॉल कोहली पाहत राहिला अन् स्टम्प उडाले, सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
Ind vs Sl 1st Test : पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
WTC Points Table : श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!
श्रीलंकेला हरवलं, 12 गुण कमावले… तरीही टीम इंडिया एकाच जागेवर; WTC रँकिंगमध्ये आला असा ट्विस्ट की सगळेच हैराण!
IND vs SL 1st Test : लंकेत टीम इंडियाचे शक्तीप्रदर्शन! पहिल्या कसोटीत घरात घुसून 165 धावांनी श्रीलंकेचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी
लंकेत टीम इंडियाचे शक्तीप्रदर्शन! पहिल्या कसोटीत घरात घुसून 165 धावांनी श्रीलंकेचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget