एक्स्प्लोर

Rishabh Pant Accident : 'कपाळावर जखमा, मनगटासह घोट्याला आणि अंगठ्याला गंभीर दुखापत', पंतच्या प्रकृतीबाबत बीसीसीआयची महत्त्वाची माहिती

Rishabh Pant Accident : भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) गाडीला भीषण अपघात झाला असून त्याच्या दुखापतीबाबत बीसीसीआयनं माहिती दिली आहे.

Rishabh Pant Health Update : उत्तराखंडच्या रुरकी येथे शुक्रवारी सकाळी भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला अपघात झाला आहे. या अपघातात (Rishabh Pant Accident) तो गंभीर जखमी झाला असून सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. दरम्यान बीसीसीआयने आता ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत ताजी माहिती दिली असून बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

बीसीसीआयने ट्वीटरच्या माध्यमातून ऋषभच्या प्रकृतीची माहिती दिली. बोर्डाने एक मीडिया स्टेटमेंट देखील ट्वीट केले आहे. बोर्डाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतचा शुक्रवारी सकाळी उत्तराखंडमधील रुरकीजवळ कार अपघात झाला. त्याला सक्शम हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी अँड ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर दुखापत झाल्यानंतर लगेच उपचार करण्यात आले. या अपघातात ऋषभच्या कपाळावर दोन जखमा झाल्या आहेत, त्याच्या उजव्या गुडघ्यालाही दुखापत झाली आहे आणि त्याच्या उजव्या मनगट, घोट्याला, पायाच्या बोटालाही दुखापत झाली आहे. त्याच्या पाठीलाही खरचटलं असून आहे. दरम्यान त्याची प्रकृती आता स्थिर असून त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. त्याच्या दुखापतींचे प्रमाण आणि पुढील उपचारांसाठी येथे एमआरआय स्कॅन केले जाणार आहे."

बोर्डाने पुढे लिहिले आहे की,"बीसीसीआय ऋषभच्या कुटुंबाच्या सतत संपर्कात आहे, तर वैद्यकीय पथक ऋषभवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सतत संपर्कात आहे. ऋषभला सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवा मिळावी याची काळजी बोर्ड घेईल. या वेदनादायक वेळेतून बाहेर पडण्यासाठी आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करू."

बीसीसीआयचं ट्वीट-

कारवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात

भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत कारला भीषण अपघात झालाय. दिल्लीहून घरी येत असताना त्याच्या कारला अपघात झालाय. यामध्ये ऋषभ गंभीर जखमी झाल्यानं त्याला तातडीनं देहरादून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कार चालवताना अचानक झोप लागल्यानं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं पंतनं सांगितलं.

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi : 15 नाही तर 17-18 वर्षांचा असेल, तरी...; वैभव सूर्यवंशीच्या वयावरून वाद; भल्याभल्या फलंदाजांना धडकी भरवणारा ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नेमकं काय म्हणाला?
15 नाही तर 17-18 वर्षांचा असेल, तरी...; वैभव सूर्यवंशीच्या वयावरून वाद; भल्याभल्या फलंदाजांना धडकी भरवणारा ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नेमकं काय म्हणाला?
IND vs SL : कायम तोंड पाडून असणारा कोच गौतम गंभीर मैदानात खळखळून हसला, सगळेच चक्रावले, जडेजाने नेमकं काय केलं?, VIDEO
कायम तोंड पाडून असणारा कोच गौतम गंभीर मैदानात खळखळून हसला, सगळेच चक्रावले, जडेजाने नेमकं काय केलं?, VIDEO
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget