एक्स्प्लोर

Rinku Singh ICC T-20 World Cup: टी-20 विश्वचषकासाठी रिंकू सिंहची निवड का झाली नाही?; अखेर महत्वाची माहिती आली समोर

Rinku Singh ICC T-20 World Cup: भारताच्या टी-20 विश्वचषक संघात रिंकूला राखीव खेळाडूंमध्ये स्थान मिळाल्याने चाहतेही नाराज झाले आहेत.

Rinku Singh ICC T-20 World Cup: आयपीएलमध्ये गेल्या वर्षी गुजरातविरुद्ध अखेरच्या षटकात सलग पाच षटकार ठोकत कोलकाताला थरारक विजय मिळवून दिला होता, तेव्हापासून रिंकू सिंहने भारतीय क्रिकेटचे लक्ष वेधले. त्यानंतर रिंकू सिंहला भारतीय क्रिकेटच्या टी- 20 संघातही संधी मिळाली. 

भारतीय संघात दाखल होताच त्याने अनेकवेळा विजय मिळवून दिले. त्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या (ICC T20 World Cup 2024) स्पर्धेत त्याला भारतीय संघाकडून संधी मिळेल अशी अनेकांना आशा होती. मात्र, मंगळवारी जाहीर झालेल्या भारताच्या टी-20 विश्वचषक संघात रिंकूला राखीव खेळाडूंमध्ये स्थान मिळाल्याने चाहतेही नाराज झाले आहेत.

मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणारा अष्टपैलू हार्दिक पांड्या अपयशी ठरूनही त्याला संघात स्थान मिळाले, तसेच भारताच्या उपकर्णधारपदाची जबाबदारीही त्याला देण्यात आली. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. अनेक माजी दिग्गज खेळाडूंनी देखील यावरुन विविध प्रतिक्रिया दिल्या. याचदरम्यान रिंकू सिंहला संघात सामील न करण्यामागचं कारण अखेर समोर आलं आहे. 

हार्दिक अपयशी ठरला असला तरी...

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्या अपयशी ठरला असला तरी तोच भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज अष्टपैलू आहे. आयपीएलमध्ये वेगवान गोलंदाज अष्टपैलू म्हणून हार्दिक पांड्यानेच गोलंदाजी केली आहे. रिंकू सिंहला कमी संधी मिळाली, पण त्याला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. 

रिंकूच्या वडिलांनी व्यक्त केली खंत-

संघात स्थान न मिळाल्यानंतर रिंकू सिंह याच्या वडिलांनी देखील मनातील खंत बोलून दाखवली आहे. त्याशिवाय रिंकूची निवड झाली म्हणून आम्ही जल्लोष केला. पण रिंकूला 15 जणांमध्ये संधी मिळाली नाही, त्याची खंत असल्याचं ते म्हणाले. टीम इंडियासाठी आम्ही खूश आहोत, असेही त्यांनी सांगितलं. रिंकू सिंह यांचे वडील म्हणाले की,  रिंकू सिंह याची निवड झाल्याचं समजताच आम्ही फटके फोडून जल्लोष केला. रिंकू सिंह विश्वचषकात प्लेईंग 11 मध्ये खेळणार असल्याचं आम्हाला वाटलं, त्यामुळे आमचा आनंद गगणात मावत नव्हता. पण रिंकूनं आईला फोन करुन 15 जणांमध्ये निवड झाली नसल्याचं सांगितलं. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. 15 जणांमध्ये निवड न झाल्यामुळे रिंकूही थोडाफार नाराज झालेला, अशी माहिती रिंकूच्या वडिलांनी दिली. 

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ -

रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. 

राखीव खेळाडू-

शुभमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद

भारतीय संघाचे वेळापत्रक

5 जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
9 जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
12 जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
15 जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 9 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSupriya Sule on Sunil tingre : पोर्श प्रकरणात बदनामी झाली तर कोर्टात खेचेन; शरद पवारांना नोटीस- सुळेABP Majha Headlines :  7 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  9  नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
Embed widget