(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ponting on Kohli : 'कोहली लवकरच पुन्हा फॉर्ममध्ये येईल; ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगने वर्तवला विश्वास
यंदाच्या आयपीएल हंगामात (ipl 2022) विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याचा सुमार फॉर्म अजूनही कायम आहे.
Virat Kohli Ricky Ponting IPL 2022 : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार कप्तान रिकी पॉटिंगने भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्याबद्दल प्रतिक्रिया देताना तो लवकरच पुन्हा एकदा फॉर्मात परत येईल अशी भविष्यवाणी केली आहे. आयसीसीने दिलेल्या वृत्तात पॉटिंगने भारताच्या पंत, कार्तिक, कोहली यांच्याबद्दलच्या प्रतिक्रिया दिल्या. यामध्ये कोहली अधिक काळ अशा खराब फॉर्ममध्ये राहणार नाही असं म्हटलं आहे.
पॉटिंग कोहलीबाबत बोलताना म्हणाला,''कारकिर्दीच्या या स्टेजमध्ये प्रत्येकासोबतच असं होत असतं, विराट तर मागील 10 ते 12 वर्षे खेळत असला तरी त्याने तितका खराब फॉर्म पाहिलेला नाही. त्यात आता तो ज्या फॉर्ममध्ये आहे, त्यात अधिक काळ नक्कीच राहणार नाही. तो एक प्रोफेशनल आणि कमाल क्रिकेटर असल्याने यातून नक्कीच मार्ग काढेल.''
IPL 2022 विराटचं सुमार प्रदर्शन
यंदाच्या आयपीएल हंगामात (ipl 2022) विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने 15 सामन्यात 22.73 च्या सरासरीने आणि 115.98 च्या स्ट्राईक रेटने 309 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात विराट कोहलीची सर्वोत्कृष्ट धावसंख्या 73 असून तो तीन वेळा शून्य धावा करुनही बाद झाला आहे.
आयसीसी क्रमवारीत विराट दहाव्या स्थानावर
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये फलंदाजीत विराट कोहली दहाव्या क्रमांकावर आहे. तर रोहित शर्मा आठव्या क्रमांकावर आहे. फलंदाजीत ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन पहिल्या क्रमांकावर आहे. जो रुटने दोन क्रमांकाने झेप घेतली आहे. रुट दुसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. तर बाबर आझमने एका क्रमांकाने झेप घेतली असून तो तिसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. तर न्यूझीलंडचा विल्यमसन आणि केन विल्यमसन यांची घसरण झाली आहे.
हे देखील वाचा-