IND vs SA 1st T20 : डायमंड डकचा शिकार होता-होता थोडक्यात वाचला कर्णधार ऋषभ पंत, पाहा VIDEO
India vs South Africa T20 Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्याच्या मालिकेला सुरुवात झाली असून पहिला सामना भारताने गमावला आहे.
India vs South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa T20 Series) यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यांत भारताला सात विकेट्सने पराभव पत्करावा लागला. कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळणाऱ्या ऋषभ पंतला (Rishabh Pant) पराभव पत्करावा लागला असून याचसोबत तो शून्यावर बाद देखील झाला असता. पण यापासून तो थोडक्यात बचावला. फलंदाजीला आल्यावर नॉन स्ट्राईकवर असताना जवळच्या चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नात पंत धावचीत झाला असता ज्यामुळे कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात त्याला डायमंड डकवर बाद व्हावं लागलं असतं.
नेमकं काय घडलं?
भारताची फलंदाजी सुरु असताना 14 वी ओव्हर कागिसो रबाडा टाकत होता. त्यावेळी स्ट्राईकवर श्रेयस अय्यर असताना नॉन स्ट्राईकवर पंत होता. दरम्यान अय्यरने शॉट खेचला असता चेंडू जास्त दूर गेला नाही. लगेचच आफ्रिकेचे फिल्डर जवळ आले ज्यामुळे पंतने घेतलेली धाव कॅन्सल करत पुन्हा मागच्या दिशेने पळाला. त्यावेळी तो आफ्रिकेच्या खेळाडूंना धडकला देखील...यामुळे तो जमिनीवर पडल्याचंही पाहायला मिळाल. पण डायमंड डक होता-होता मात्र तो वाचला. पुढे जाऊन सामन्यात त्याने 16 चेंडूत 29 धावा केल्या.
पाहा व्हिडीओ -
विराटच्या नकोशा विक्रमाशी बरोबरी
ऋषभ पंत भारतीय टी 20 संघाचा आठवा कर्णधार होय. पण ऋषभ पंतच्या नेतृत्वात भारतीय संघाचा पराभव झालाय. यासह पंतच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. विराट कोहलीनेही पहिल्या सामन्यात कर्णधारपद स्वीकारल्यानंतर भारताचा पराभव झाला होता. या नकोशा विक्रमाशी पंतने बरोबरी केली.
भारताचा सात विकेट्सनी पराभव
डेविड मिलर आणि रॅसी वॅन डर डुसेन यांच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं भारताचा सात गड्यांनी पराभव केला. भारताने दिलेले 212 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकाने सात गडी आणि पाच चेंडू राखून पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेकडून डेविड मिलर आणि डुसेन यांनी मॅच विनिंग खेळी केली. डेविड मिलरने नाबाद 64 तर डुसेन याने नाबाद 75 धावांची खेळी केली. ईशान किशनची 76 धावांची खेळी व्यर्थ केली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं पाच सामन्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
हे देखील वाचा-