IND vs SA: तीन विकेट घेताच चहल करणार भीमपराक्रम, अश्विनचाही रेकॉर्ड मोडणार
India vs South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात पाच सामन्याच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली.
India vs South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात पाच सामन्याच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये (Arun Jaitley Stadium) झालेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा धुव्वा उडवला. आता दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ कटकमध्ये पोहचलाय. हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालाय. आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱ्या युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) नवा रेकॉर्ड करण्याची संधी आहे. चहलला अनुभवी रवीचंद्रन आश्विन (Ravichandran Ashwin) यालाही मागे टाकण्याची संधी आहे. चहलला फक्त तीन विकेटची गरज आहे.
Team India arrives in Bhubaneswar for the 2nd T20i in Cuttack. pic.twitter.com/ZJbsxCuMGB
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 10, 2022
दक्षिण आफ्रीका (south africa) संघाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात चहल टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू बनू शकतो. युजवेंद्र चहलने आतापर्यंत 243 टी20 सामन्यात 274 विकेट्स घेतल्या आहेत. तर आश्विननेन 282 टी20 सामन्यात 276 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे केवळ 3 विकेट्स घेताच चहल आश्विनला मागे टाकून सर्वाधिक टी20 विकेट्स घेणारा भारतीय खेळाडू बनू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट्सचा विचार करता चहलने भारतासाठी 55 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 68 विकेट्स घेतल्या असून आयपीएलमध्ये 131 सामन्यात 166 विकेट्स घेतल्या आहेत. तर स्थानिक टी20 क्रिकेटमध्येही त्याने 40 विकेट्स घेतल्या आहेत. यंदाच्या आयपीएलच्या 15 व्या हंगामात त्यांनी 17 सामन्यात 19.51 च्या सरासरीने आणि 7.75 च्या इकॉनॉमीने 27 विकेट्स घेत पर्पल कॅप मिळवली.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांचे वेळापत्रक
सामना | दिनांक | ठिकाण |
पहिला टी20 सामना | 9 जून | अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली |
दुसरा टी20 सामना | 12 जून | बाराबती स्टेडियम, कट्टक |
तिसरा टी20 सामना | 14 जून | डॉ वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम,विशाखापट्टणम |
चौथा टी20 सामना | 17 जून | सौराष्ट्र क्रिकेट असोसीएशन स्टेडियम, राजकोट |
पाचवा टी20 सामना | 19 जून | एम. चिन्नस्वामी स्टेडियम बंगळुरु |