'आजकाल निवृत्ती म्हणजे...', रोहित शर्मा घेणार यू-टर्न अन् खेळणार टी-20 क्रिकेट?
कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने टी-20 क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे....
!['आजकाल निवृत्ती म्हणजे...', रोहित शर्मा घेणार यू-टर्न अन् खेळणार टी-20 क्रिकेट? Retirement has become a joke these days in world cricket Rohit Sharma on quitting T20Is Cricket News Marathi 'आजकाल निवृत्ती म्हणजे...', रोहित शर्मा घेणार यू-टर्न अन् खेळणार टी-20 क्रिकेट?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/18/296b58c82e7f0eaadf5fc0cc35306f5717266627064451091_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rohit Sharma : कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने टी-20 क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. 2024 टी-20 वर्ल्ड कप विजेतेपद भारताला जिंकून दिल्यानंतर रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. यानंतर रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत टी-20 प्रमाणे फलंदाजी केली. त्यानंतर चर्चा सुरू झाली की, कदाचित रोहित टी-20 मधून निवृत्ती माघारी घेईल. पण आता त्याने निवृत्तीवर मजेशीर उत्तर दिले आहे.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी रोहित शर्मा जिओ सिनेमावर म्हणाला, "आजकाल जागतिक क्रिकेटमध्ये निवृत्ती हा विनोद बनला आहे. लोक निवृत्तीची घोषणा करतात, पण नंतर पुन्हा खेळायला येतात. भारतात असे घडले नाही. मात्र, इतर देश त्यांच्या निवृत्तीची घोषणा करतात. परंतु नंतर यू-टर्न घेतात जेणेकरून कोणीतरी खरोखर निवृत्त झाले आहे की नाही हे तुम्हाला कधीच कळणार नाही."
टी-20 इंटरनॅशनलमधून निवृत्तीबाबत रोहित म्हणतो की, "माझा निर्णय अंतिम आहे आणि मी अगदी स्पष्ट आहे. टी-20 इंटरनॅशनलला अलविदा करण्याची हीच योग्य वेळ होती. मी माझी निवृत्ती परत घेणार नाही." रोहितने असेही सांगितले की, त्याला टी-२० फॉरमॅट खेळायला खूप आवडते.
रोहित आयपीएलमध्ये खेळत राहणार
रोहित शर्माने नुकतीच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे. मात्र, आयपीएल 2025 मध्ये तो संघ बदलणार असल्याची चर्चा आहे. जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला गेला तर, रोहित शर्माने मुंबई इंडियन्सपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि आगामी हंगामात तो इतर काही संघात खेळताना दिसू शकतो. लखनऊ सुपर जायंट्सला टी-20 वर्ल्ड कप विजेत्याला आपला कर्णधार बनवायचा आहे, अशीही बातमी आली होती. अशा परिस्थितीत रोहित आयपीएल 2025 मध्ये कोणत्या संघासोबत खेळताना दिसतो हे पाहणे बाकी आहे.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)