WPL 2023 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आज मैदानात, कधी, कुठे पाहाल सामना?
RCB vs DC WPL 2023 Live Streaming : महिला आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाली असून आज रविवारी दोन सामने खेळवले जाणार आहेत. ज्यातील पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु असा रंगणार आहे.
Women’s Premier League 2023 : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या हंगामाला थाटामाटात सुरुवात झाली असून सलामीचा सामना मुंबई इंडियन्सने 143 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकल्यावर आज रविवारी दोन सामने खेळवले जाणार आहेत. ज्यातील पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB vs DC) असा रंगणार आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियमवर हा खेळवला जाईल. या संपूर्ण हंगामाचे स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळला जाणारा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होणार आहे. त्यापूर्वी अर्धातास नाणेफेक होणार आहे.
Ready to paint the country RED! 🎨🔴
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 5, 2023
Get in, girls! 🙌#PlayBold #ನಮ್ಮRCB #SheIsBold #WPL2023 pic.twitter.com/6j6nkaruTK
कसे आहेत दोन्ही संघ?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ : स्मृती मानधना (कर्णधार), डेन व्हॅन निकर्क, एलिस पेरी, हेदर नाइट, सोफी डिव्हाईन, एरिन बर्न्स, रिचा घोष (विकेटकिपर), मेगन शुट, रेणुका ठाकूर सिंग, दिशा कासट, कोमल झांझाड, कनिका आहुजा, श्रेयंका पाटील, प्रीती बोस, सहाना पवार, पूनम खेमनार, आशा शोबाना, इंद्राणी रॉय
दिल्ली कॅपिटल्सचा संघ : तानिया भाटिया (विकेटकिपर), शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, मेग लॅनिंग (कर्णधार), अॅलिस कॅप्सी, लॉरा हॅरिस, जसिया अख्तर, शिखा पांडे, मारिजाने कॅप, स्नेहा दीप्ती, राधा यादव, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, जेस जोनासेन, तीतास साधू, अपर्णा मंडल, मिन्नू मणी, तारा नॉरिस
सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे पाहाल?
दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या महिला संघात खेळल्या जाणाऱ्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यांच्याकडे संपूर्ण हंगामातील सामन्यांचे प्रसारण अधिकार आहेत. त्याच वेळी, या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमाच्या अॅप आणि वेबसाइटवरून पाहता येईल. ज्यामध्ये त्यांना हे सामने Jio सिनेमावर 4K मध्ये पाहण्याची सुविधा मिळेल.
WPL 2023 मध्ये कोणते संघ सहभाग घेत आहेत?
मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स हे संघ स्पर्धेत सहभागी होत असून सर्व सामने मुंबईच्या दोन स्टेडियममध्ये खेळवले जातील. डीवाय पाटील स्टेडियमवर 11 सामने आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर 11 सामने होणार आहेत.
हे देखील वाचा-