WPL 2023 1st Match MIW vs GGW : मुंबई इंडियन्सकडून गुजरात जायंट्सचा धुव्वा , पहिल्याच समान्यात 143 धावांनी विजय
WPL 2023 1st Match MIW vs GGW : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सत्रातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा 143 धावांनी धुव्वा उडला आहे.
WPL 2023 1st Match MIW vs GGW : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सत्रातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा 143 धावांनी धुव्वा उडला आहे. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दोन्ही संघात लढत झाली. मुंबई इंडियन्सने दिलेल्या 207 धावांचा पाठलाग करताना गुजरात जायंट्सचा संपूर्ण संघ 15 षटके आणि एका चेंडूत केवळ 64 धावाच करू शकला.
गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने पहिल्याच सामन्यात 200 धावांचा टप्पा पार केला. मुंबईने 20 षटकात 5 बाद 207 धावा केल्या. मुंबई इंडियन्स आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने इतिहास रचला आहे. मुंबई इंडियन्सकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक 65 धावा केल्या. तिने 39 चेंडूंच्या खेळीत 14 चौकार मारले.ती या स्पर्धेतील अर्धशतक झळकावणारी पहिली फलंदाज ठरली आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सने पहिल्याच डावात 200 धावांचा टप्पा पार करत इतिहास रचला आहे.
प्रथम फलंजादीजीला आलेल्या मुंबई इंडियन्सकडून सलामीवीर हिली मॅथ्यूजने 31 चेंडूत 47 धावा केल्या. तर अमेलिया केरने 24 चेंडूत नाबाद 45 धावा केल्या. नताली सीव्हरने 23 आणि पूजा वस्त्राकरने 14 धावांचे योगदान दिले. यास्तिका भाटिया एक धाव काढून बाद झाली. इसी वँगने एका चेंडूत सहा धावा केल्यानंतर नाबाद राहिली. गुजरात जायंट्सकडून स्नेह राणाने सर्वाधिक दोन बळी घेतले. ऍशले गार्डनर, तनुजा कंवर आणि जॉर्जिया वेरेहम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
मुंबई इंडियन्सने दिलेल्या 207 धावांचा पाठलाग करताना गुजरात जायंट्स संघाची सुरुवात खराब झाली. अवघ्या पाच धावांत त्यांनी 3 विकेट्स गमावल्या. त्यात हरलीन आणि गार्डनर यांना भोपळाही फोडता आला नाही.कर्णधार बेथ मूनी तिसऱ्याच चेंडूवर दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर पडली. गुजरात जायंट्स संघाचे चार फलंदाज शुन्यावर बाद झाले. तर केवळ दोन फलंदांजांनी दोन आकडी धावसंख्या केली.