एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

WTC Final 2023 : ऑस्ट्रेलियाविधात टीम इंडियाचे कोणते 11 शिलेदार उतरणार? रवि शास्त्रींनी वर्तवला अंदाज

WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल रंगणार आहे.

Ravi Shastri picks his India 11 for the WTC final on ICC website : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल रंगणार आहे. आयपीएलमुळे टीम इंडियातील खेळाडू टप्प्या टप्प्याने इंग्लंडला जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात विराटसह काही खेळाडू रवाना झाले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपमध्ये टीम इंडियाचे 11 खेळाडू कोणते असतील.. याचा अंदाज वर्तवला जातोय. भारतीय संघाचे माजी कोच आणि खेळाडू रवि शास्त्री यांनी आयसीसीच्या संकेतस्थळासाठी आपली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी प्लेईंग 11 निवडली आहे. 

रवि शास्त्री यांनी आपल्या प्लेईंग 11 मध्ये रविंद्र जाडेजा आणि आर. अश्विन या दोन फिरकी गोंलदाजांना स्थान दिलेय. त्याशिवाय विकेटकिपर म्हणून केएस भरत याला स्थान दिलेय... मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शामी या दोन वेगवान गोलंदाजांचा समावेश केलाय. उमेश यादव, इशान किशन आणि अक्षर पटेल यांना रवि शास्त्री यांनी आपल्या संघात स्थान दिले नाही. 

रवि शास्त्री यांनी निवडलेली प्लेईंग 11 पाहूयात..

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा, केएस भरत (विकेटकिपर), शार्दूल ठाकूर, आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

Rohit (C), Gill, Pujara, Kohli, Rahane, Jadeja, KS Bharat (WK), Thakur, Ashwin, Shami, Siraj.

टीम इंडियाची पहिली बॅच लंडनमध्ये दाखल होणार
भारतीय संघ तीन बॅचमध्ये लंडनमध्ये दाखल होणार आहेत. पहिली बॅच आज रवाना  झाली आहे. विराट कोहली दोन आठवडे सराव करणार आहे. पहिल्या बॅचमध्ये विराट कोहलीसह रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव हे प्रमुख खेळाडू असतील. विराट कोहली आणि मोहम्मद सिराज रवाना झाल्याचे समोर आलेय. इतर खेळाडूंबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. ते खेळाडू आजच पवाना होणार आहेत.

सात जूनपासून रंगणार थरार

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या 'द ओव्हल' येथे खेळवण्यात येणार आहे. 7 जून, 2023 पासून सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे संघ ठरले, ठिकाण ठरलं आणि दिवसही ठरला, मग आता विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीवर नाव कोण कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

India vs Australia, WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात कोण कोणते खेळाडू आहेत ?

Team India : टीम इंडिया  
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा , विराट कोहली, अजिंक्य रहाणे , केएस भरत (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटले, शार्दुल ठाकूर,  मोहमद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव,  जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकिपर) 

Team Australia : टीम ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उप कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8PM 27 November 2024JOB Majha : कुठे आहे नोकरीची संधी ?Nana Patole On Eknath Shinde : दिल्लीतून दबाव आला म्हणून एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतलाDelhi Meeting On Maharashtra Cabinet:  एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पावारंची उद्या दिल्लीत बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Mumbai Indians : लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
Embed widget