Sanju Samson in Ranji Trophy 2025 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून वगळल्यानंतर संजू सॅमसनची तुफानी खेळी! रणजी मॅचमध्ये ठोकले वन डे स्टाइल अर्धशतक
2025-26 रणजी ट्रॉफीच्या एलिट ग्रुप बी मध्ये केरळ आणि महाराष्ट्र हे संघ खेळत आहेत. तिरुअनंतपुरम येथील ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियम येथे हा सामना रंगला आहे.

Kerala vs Maharashtra Ranji Trophy 2025 Match : 2025-26 रणजी ट्रॉफीच्या एलिट ग्रुप बी मध्ये केरळ आणि महाराष्ट्र हे संघ खेळत आहेत. तिरुअनंतपुरम येथील ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियम येथे हा सामना रंगला आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या डावातील 239 धावांच्या प्रत्युत्तर केरळ फलंदाजी करत आहे. त्यांची सुरुवात खराब होती, त्यांचे टॉप-ऑर्डर फलंदाज अपयश ठरले. दरम्यान, संजू सॅमसनने (Sanju Samson in Ranji Trophy 2025) केवळ आपल्या संघाला स्थिर केले नाही तर एक शानदार खेळीही केली.
भारतीय विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 वर्षे पूर्ण केली असली, तरी या दशकात त्याला त्याच्या योग्यतेइतके संधी मिळाल्या नाहीत. अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी जाहीर झालेल्या भारतीय संघातही त्याला स्थान देण्यात आले नाही. विशेष म्हणजे, सॅमसनने आपल्या शेवटच्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर शतक झळकावत भारताला विजय मिळवून दिला होता. तरीदेखील, ऋषभ पंत अनुपस्थित असताना देखील त्याला दुर्लक्षित करून ध्रुव जुरेल याला पहिल्यांदाच वनडे संघात स्थान देण्यात आले.
दरम्यान, संजू सॅमसनने आता रणजी ट्रॉफी 2025 च्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्राविरुद्ध अर्धशतक झळकावून आपल्या निवडीबाबत बोलणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्याने दाखवून दिले की ते फक्त टी-20 पुरते मर्यादित खेळाडू नाहीत, तर दीर्घ फॉर्मेटलाही तितकाच जबरदस्त खेळाडू आहे.
WELL PLAYED, SANJU SAMSON 🔥
— Johns. (@CricCrazyJohns) October 17, 2025
- 53 runs from 63 balls when Kerala was 35/3 against Maharashtra, great confidence booster ahead of the T20I series. pic.twitter.com/RG8o9CrKcB
संजूने 5 चौकार आणि 1 षटकारासह ठोकल्या इतक्या धावा...
भारतासाठी 16 वनडे सामने खेळूनही संघातून बाहेर ठेवण्यात आलेल्या सॅमसनने रणजीत दमदार खेळी करत 51 चेंडूंवर अर्धशतक ठोकले. जेव्हा केरलचा स्कोअर फक्त 35/3 असा होता, त्यावेळी तो मैदानात आला. त्याने चौथ्या विकेटसाठी सचिन बेबीसोबत 40 धावांची आणि पाचव्या विकेटसाठी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनसोबत 57 धावांची भागीदारी केली.
सॅमसनने जवळपास 85 च्या स्ट्राईक रेटने 63 चेंडूंच्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकारासह 54 धावा केल्या. त्याच्या वनडे कारकिर्दीतील स्ट्राईक रेट 99.61 आहे. त्याने आतापर्यंत भारतासाठी 16 वनडे सामन्यांत 1 शतक, 3 अर्धशतके मिळवून 510 धावा केल्या आहेत. तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 49 सामन्यांत 3 शतक आणि 3 अर्धशतकांसह 993 धावा झळकावल्या आहेत.
https://t.co/rLJSBVK5WO pic.twitter.com/xa8k1Onfve
— Sachin™ (@SAMSONFAN09) October 17, 2025
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, महाराष्ट्राने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये संघाने 0 धावांवर 3 विकेट आणि 18 धावांवर 5 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर ऋतुराज गायकवाड (91) आणि जलज सक्सेना (49) यांनी डाव सावरला. अखेरीस विकी ओस्टवाल (38) आणि रामकृष्ण घोष (31) यांच्या खेळीमुळे महाराष्ट्राने पहिल्या डावात 239 धावा उभारल्या. केरळकडून निधीशने पाच बळी घेतले. प्रत्युत्तरादा, केरळची पहिल्या डावात सुरुवात खराब झाली. एका वेळी, 35 धावांवर तीन बळी गमावल्यानंतर त्यांना संघर्ष करावा लागला. संजू सॅमसनच्या खेळीमुळे, त्यांनी उपाहारापर्यंत 6 बाद 152 धावा केल्या, तरीही ते 87 धावांनी पिछाडीवर होते.
















