Samit Dravid Unsold News : 'द वॉल'च्या मुलाला कोणीच खरेदी केले नाही; राहुल द्रविडचा मुलगा अनसोल्ड, देवदत्त पडिक्कलवर पैशांचा पाऊस
Rahul Dravid Son Samit Dravid News : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि महान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड याला मोठा धक्का बसला आहे.

Samit Dravid Unsold In Maharaja Trophy KSCA T20 Auction : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि महान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड याला मोठा धक्का बसला आहे. कूच बिहार ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी करूनही समितला आपल्या घरच्या मैदानातच दुर्लक्षित करण्यात आलं आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या (KSCA) तर्फे आयोजित 'महाराजा ट्रॉफी 2025' या टी-20 स्पर्धेच्या लिलावात समित द्रविडला कोणत्याही संघाने खरेदी केलं नाही. मागील हंगामात त्याने या स्पर्धेत सहभाग घेतला होता, मात्र यंदा तो 'अनसोल्ड' राहिला.
मागील वर्षी समित द्रविड़ ‘मेसूर वॉरियर्स’ संघाकडून खेळला होता. या संघाने त्या हंगामात विजेतेपद पटकावलं होतं. मात्र समितचा फॉर्म फारसा चांगला नव्हता. त्याने 7 सामन्यांत फक्त 11.71 च्या सरासरीने 82 धावा केल्या होत्या आणि एकही विकेट मिळवू शकला नव्हता. याच कामगिरीचा परिणाम म्हणून यंदा कोणत्याही संघाने त्याच्यावर बोली लावली नाही.
कूच बिहार ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी
समितने मात्र कूच बिहार ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. 8 सामन्यांत त्याने 362 धावा आणि 16 विकेट घेतल्या होत्या. अंतिम सामन्यात देखील त्याने जबरदस्त खेळी करत कर्नाटकालाच मुंबईवर मोठा विजय मिळवून दिला होता.
यंदाची स्पर्धा आणि स्टार खेळाडू
'महाराजा ट्रॉफी 2025' ही स्पर्धा यंदा 11 ते 27 ऑगस्टदरम्यान बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. यंदाच्या हंगामात अनेक स्टार खेळाडू मैदानात उतरतील.
पडिक्कल सर्वात महागडा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आयपीएल खेळणारा डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कल याला हुबळी टायगर्सने तब्बल 13.20 लाख रुपयांत खरेदी केलं असून तो यंदाच्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. सनरायझर्स हैदराबादचा अभिनव मनोहर आणि कोलकाता नाइट रायडर्सचा मनीष पांडे हे दोघेही 12.20 लाख रुपयांत अनुक्रमे हुबळी टायगर्स आणि मेसूर वॉरियर्स संघात सामील झाले आहेत.
शिवमोगा लायन्सने वेगवान गोलंदाज विद्वाथ कवरप्पाला 10.80 लाखात, तर बंगळुरू ब्लास्टर्सने विद्याधर पाटीलला 8.30 लाखात आपल्या ताफ्यात घेतलं आहे. अनीश्वर गौतम (8.20 लाख, शिवमोगा लायन्स) आणि श्रेयस गोपाल (8.60 लाख, मंगळुरू ड्रॅगन्स) यांचीही लिलावात खरेदी केले. या लीगमध्ये प्रसिद्ध कृष्णा, करुण नायर यांसारखे अनुभवी खेळाडूही मैदानात दिसणार आहेत.
हे ही वाचा -





















