Sanath Jayasuriya Video Leak Controversy : एक खेळाडू, तीन लग्नं… आयुष्यच बनलं थ्रिलर, तिसऱ्या पत्नीने केला होता प्राइव्हेट व्हिडिओ लीक
श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि आक्रमक फलंदाज सनथ जयसूर्या यांचं नाव क्रिकेटच्या इतिहासात सोन्या अक्षरात कोरलेलं आहे.

Sanath Jayasuriya Private Video Leak Controversy : श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि आक्रमक फलंदाज सनथ जयसूर्या यांचं नाव क्रिकेटच्या इतिहासात सोन्या अक्षरात कोरलेलं आहे. त्यांनी आपल्या आक्रमक फलंदाजीने 90 च्या दशकात वनडे क्रिकेटचं स्वरूपच बदलून टाकलं. गोलंदाज म्हणूनही त्यांनी आपल्या संघाला अनेक सामने जिंकून दिले. पण जितकं तेजस्वी त्यांचं क्रिकेट करिअर होतं, तितकंच गुंतागुंतीचं आणि दुःखद होतं त्यांचं वैयक्तिक आयुष्य. आज 56 वर्षांचे असलेले जयसूर्या तीन वेळा विवाहबंधनात अडकले, पण दुर्दैवाने तीनही नातं अपयशी ठरलं.
पहिलं लग्न... पण काही महिन्यांतच शेवट
सनथ जयसूर्याचं पहिलं लग्न 1998 मध्ये सुमुद करुणानायक हिच्याशी झालं, जी एअर श्रीलंका मध्ये ग्राउंड होस्टेस म्हणून काम करत होती. हे नातं फार काळ टिकलं नाही. काही महिन्यांतच विभक्त झाले. जयसूर्याचं म्हणणं होतं की, ही नातं त्याच्या क्रिकेट कारकिर्दीस अडथळा ठरत होती. शिवाय, पत्नीने त्याला सोडलं, ज्यामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्थिर झाला होता.
दुसऱ्या लग्नात प्रेमात हरवला
2000 मध्ये त्याने दुसरं लग्न सेंड्रा डिसिल्वा हिच्याशी केलं, जीही एक फ्लाइट अटेंडंट होती. या जोडप्याला तीन मुलं साविंदी, यालिंदी आणि रौनक झाली. परंतु हे लग्नही फार काळ टिकलं नाही. 2012 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. रिपोर्ट्सनुसार, जयसूर्याचं दुसऱ्या महिलेसोबत अफेयर होतं, हेच या विभाजनामागचं प्रमुख कारण होतं.
तिसरं लग्न त्याने मॉडेल आणि अभिनेत्री मलिका सिरिसेना हिच्याशी केलं. 2012 मध्ये माउंट लाविनियामधील एका बौद्ध मंदिरात ही गुपचूप लग्नसोहळा पार पडला. पण काही महिन्यांतच मलिकाने जयसूर्याला सोडून एका बिझनेसमनशी विवाह केला. यानंतरच जयसूर्याच्या आयुष्यातील सर्वात विवादग्रस्त प्रसंग घडला.
व्हायरल झालेला ‘तो’ प्रायव्हेट व्हिडीओ
2017 मध्ये सोशल मीडियावर एक प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये जयसूर्या दिसत होता. रिपोर्ट्सनुसार, या व्हिडीओमागे जयसूर्याकडून बदला घेण्यासाठी तो लीक केला, असा आरोप करण्यात आला. हा व्हिडीओ व्हॉट्सअॅपसह अनेक प्लॅटफॉर्म्सवर वाऱ्याच्या वेगाने पसरला आणि जयसूर्याच्या वैयक्तिक आयुष्याला मोठा धक्का बसला.
क्रिकेट करिअर
जयसूर्याने 110 टेस्टमध्ये 6973 धावा, 445 वनडेमध्ये 13430 धावा केल्या. वनडेमध्ये 28 शतकं, आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 440 विकेट्स घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 1996 मध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या श्रीलंकेच्या संघाचा ते महत्त्वाचा भाग होते. 2011 मध्ये त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
हे ही वाचा -




















