Indian Cricket New Coach : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर राहुल द्रविडचं मोठं वक्तव्य, म्हणाला...
Indian Cricket New Coach: भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची निवड झाल्याने संघाला अधिक फायदा होण्याची शक्यता आहे.
Rahul Dravid Appointed New Head Coach of Team India: भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. बीबीसीसीआयने याबाबत माहिती दिली आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने बुधवारी भारतीय वरिष्ठ क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडच्या नियुक्तीला एकमताने मंजुरी दिली. द्रविडच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी आनंद व्यक्त केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर राहुल द्रविड म्हणाला, "भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती होणे हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे आणि मी या जबाबदारीसाठी तयार आहे. रवी शास्त्री नेतृत्वाखाली संघाने चांगली कामगिरी केलीय आणि हीच कामगिरी पुढे नेण्यासाठी मी संघासोबत काम करण्यास उत्सुक आहे."
वाचा : Indian Cricket New Coach: राहुल द्रविड भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, बीसीसीआयची घोषणा
राहुल द्रविड पुढे म्हणाला की, "NCA, U19 आणि India A सेटअपमधील बहुतेक मुलांसोबत जवळून काम केल्यामुळे, मला माहित आहे की त्यांना दररोज नवीन काही शिकण्य़ाची आवड आणि इच्छा आहे. पुढील दोन वर्षांतील काही प्रमुख स्पर्धा आहेत, आणि त्यासाठी मी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसोबत काम करण्यास उत्सुक आहे.
बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात लिहिले आहे की, "बोर्ड रवी शास्त्री (माजी संघ संचालक आणि मुख्य प्रशिक्षक), बी अरुण (गोलंदाजी प्रशिक्षक), आर श्रीधर (क्षेत्ररक्षक प्रशिक्षक) आणि विक्रम राठोर (फलंदाजी प्रशिक्षक) यांचे त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी अभिनंदन करण्यात आलं. शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वामुळे, भारतीय क्रिकेट संघाने धाडसी आणि निर्भय दृष्टीकोन स्वीकारला. भारतीय क्रिकेट संघाने चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय संघ कसोटी प्रकारात जगातील नंबर वन संघ बनला आणि पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला."
राहुल द्रविड सध्या बंगळरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम पाहत आहेत. त्यांनी यापूर्वी श्रीलंकेच्या दौऱ्यावर प्रशिक्षक म्हणून काम केले. त्यांनी 2016 पासून अंडर-19 टीमचा प्रशिक्षक म्हणून काम केले. त्याच्या मार्गदर्शनात भारताने सलग दोन वेळा अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये स्थान मिळवले. तर, 2018 मध्ये अंडर-19 संघाने विश्वचषकावर आपले नाव देखील कोरले. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली मयंक अग्रवाल, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत सारखे खेळाडू तयार झाले आहेत.
द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 79 वनडे आणि 25 कसोटी सामने खेळले होते. या सामन्यांपैकी 50 टक्के सामने भारताने जिंकले होते. द्रविड यांचे भारतीय संघाला सर्वश्रेष्ठ बनवण्याचे स्वप्न होते, भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी एका मुलाखतीत सांगतिले होते.
संबंधित बातम्या :
Team India Coach Update: प्रशिक्षक पदासाठी राहुल द्रविडला मिळणार घसघशीत मानधन, 2023 पर्यंत असणार कोच
Rahul Dravid : द्रविडच्या मार्गदर्शनात टीम इंडिया पुन्हा नंबर वन होणार?
Rahul Dravid : 'तो माझ्यासाठी अभिमानाचा क्षण नव्हता'; राहुल द्रविड जेव्हा चिडून टोपी फेकतो....